राळेगाव डेपोतून धावतात बिना प्लेक्स बसेस,आगार प्रमुखाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो या भागात सर्वात जास्त आदिवासी नागरिकांची संख्या जास्त आहे. दिवाळी हा सन झाल्याने आता महिला भगीनी भाऊबिजेसाठी ये जा करन्यासाठी एस टिचा लाभ घेतात आज दिनांक 24 रोजी दुपारी राळेगाव आगारात प्रवाशांची भयानक गर्दी जमली होती बस स्टॅण्ड मध्ये बिना प्लेक्स च्या दोन बसेस उभ्या होत्या पण प्रवाशांना कळत नव्हते कि बस हि नेमकी कोणत्या गावाला जात आहे म्हणून. बस जवळ चालक व वाहक सुद्धा उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याचाच फायदा खाजगी वाहन घेताना दिसत आहे. राळेगाव डेपो हा नेहमीच कोनत्या ना कोनत्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेला दिसून येतो. तसेच राळेगाव ते वडकी, मेटिखेडा, यवतमाळ, कळंब, वर्धा या ठिकाणी धावतात पण बस स्टाॅप सोडून मागे किंवा पुढे बस थांबविल्या जाते . या सर्व बाबीकडे आगार प्रमुखाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
वरिष्ठांनी या़ची दखल घेण्यात यावी