वरूड जहांगीर येथे सेवालाल महाराज की जयचा गजर, पंचक्रोशीतील दुमदुमली वरूड नगरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे दिनांक 15/2/2023 रोज बुधवारला बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात सर्वप्रथम सकाळी संत सेवालाल महाराजाची पालखी सजवून त्या पालखीत फोटो आणि फेटा ठेवून पालखी तयार करण्यात आली.त्या पालखीसोबत बंजारा वाद्य डफडे आणि ढाल्या,सोबतच राळेगाव येथील नामांकित बॅंड पथक,वारकरी भजन, बंजारा भजन मंडळ, कळंब तालुक्यातील कात्री येथील घोडा,अशा पद्धतीने नियोजन करून त्या पालखीला घेऊन संपूर्ण गावात मिरवणूकिच्या माध्यमातून प्रदक्षिणा घालून परत पालखी जगदंबा माता व संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात सकाळी बारा वाजता निघालेली मिरवणूक सायंकाळी 5.00 वाजता परत आली.त्यानंतर सेवालाल महाराजाला भोग लावण्यात आला.त्यानंतर संपूर्ण उपस्थित भाविक, समाजबांधव यांना महाप्रसादाचे जेवन करण्यात आले.ही चालत असलेली सेवालाल महाराज जयंती गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात येत असून ही जयंती समाजा व्यतिरिक्त बाहेरून कुठल्याही प्रकारची वर्गणी वसूल न करता समाज बांधवांच्या आर्थिक मदतीने हा कार्यक्रम पार पडला.या दिवशी बंजारा समाज बांधव आपली सर्व कामे बाजूला सारून या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात.या कार्यक्रमाचा शेवट महाप्रसादाने संपन्न झाला.