
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षणं व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे दिनांक ३ व ४ जानेवारी २०२५ रोजी वार्षिक स्नेहसमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून वडकी पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री सुखदेव बोरखडे, श्री नरेंद्रनं ई के सेंट्रल बँक ऑफ इंडिया ब्रांच मॅनेजर, वडकी च्या सरपंच्या सौ कलावती कोरडे, आणि डॉ प्रणाली सायंकर ह्या लाभल्या होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री रणधीर सिंग दूहन संस्थेचे सचिव श्री सत्यवान सिंग दूहन प्राचार्य श्री सचिन ठमके (रिसोर्स पर्सन ऑफ सी बी एस ई) होते. कार्यक्रमांत नर्सरी ते वर्ग बारावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता एकदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास आणि कलागुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष यांनी केले त्याच प्रमाणे श्री सुखदेव बोरखडे ठाणेदार वडकी पोलीस स्टेशन पोस्को कायदा या बद्दल बखान केले व सोशल मीडिया या पासून होणारे दुरूपयोग या बद्दल माहिती दिली.
तसेच शाळेतली संगित कार्यक्रमांचे सुध्धा आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक वृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.
पालकांचा प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
