
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
दिनांक 08/03/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळखुटी येथे स्पेक्ट्रम कॉटफायबर एलएलपी द्वारा जिल्हा परिषद शाळेतील मुलांची भव्य रॅली काडण्यात आली व नंतर BCI च्या पूर्ण सातही प्रिंसिपल वर माहिती देण्यात आली.
या सर्व मुद्यावर मार्गदर्शन करून जागतिक महिला दिनाचे महत्व, शेती व्यवसायात महिलांचा सहभाग यावर मनोगत व्यक्त करण्यात आले.महिलांसाठी व शाळेतील विद्यार्थ्यांनी साठी वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या व शाळेमधील मुलींच्या गितगायन स्पर्धा,
बटाटा वडा स्पर्धा,संगीतखुर्ची असे कार्यक्रम घेण्यात आले. यात गावातील महिलांनी उत्सपूर्तपणे सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला पिंपळखुटी येथील सरपंच अंजलिताई तायडे या अध्यक्ष म्हणून लाभल्या.प्रमुख पाहुणे म्हणून रुपाली तडस (महीला सल्लागार) ‚नरेश बाजरे (PU समन्वयक ), कवडूजी सर (जि प. मुख्याध्यापक), सीमाताई अष्टाकर (अध्यक्ष, ग्रामसंघ), लक्ष्मण यादस्कर (प्रशेत्र अधिकारी ), हितेश भोयर (प्रशेत्र अधिकारी ),शाळेतील इतर शिक्षक वृंद व तसेच गावातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.
