राळेगाव वडकी ची विज वितरण व्यवस्था कोलमडली

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव वडकी येथील विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे नियोजन शुन्य गलथान कारभारामुळे विज वितरण व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. परीणामी परीसरातील जनता अक्षरशः त्रासल्या गेली असुन हा अधिकारी कारण नसतांना तासंतास लाईट बंद करून परीसरातील जनतेला विनाकारण वेठीस धरत असल्याचा आरोप होत आहे. या बाबत मात्र लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र रूप धारण करणार असल्याचे कळते.पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होणे हि आता नित्याचीच बाब झाली आहे. परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. दिवस रात्र चार चार घंटे विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. गावात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राळेगाव वडकी विज वितरण कंपनीचा बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. परंतु महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. राळेगाव वडकी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित न थांबवल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वीज वारंवार बंद होत असल्याने नागरिकांना विद्युत उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळनेही मुश्कील झाले आहे. तसेच लहान मोठे उद्योग असणाऱ्या दुकानदार तसेच व्यावसायिकांचीही अडचण निर्माण झाली आहे. एकूणच, सर्व ‘कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर
मुद्द्याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.मागील दोन महिन्यांपासून प्रत्येक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. राळेगाव वडकी महावितरण अधिकाऱ्यांच्या नियोजन व देखभाली अभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. वडकी परिसरातील ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. वडकी सह परिसरातील उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे झाले आहे.