
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगांव तालुक्यातील सावनेर येथील प्रफुल त्र्यंबक मडावी वय वर्षे अंदाजे २५ धंदा शेती या तरुण युवकाने दिं २५ मार्च २०२४ रोज सोमवरला रात्री ८ वाजताच्या दरम्यान आंजी रोडवरील स्वताच्या शेतात हिवराच्या झाडाला गळफास घेतलेला आत्महत्या केल्याची घटना घडली .
सदर मृतक प्रफुल याला कानाने कमी येकु येत होते तसेच तो तोतडा बोलत होता घटनेची माहिती गावकऱ्यांनी राळेगांव पोलिस ठाण्यात देन्यात आली घटनास्थळी पोलिस दाखल होऊन प्रेत उत्तरणीय तपासणी करिता राळेगांव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून प्रफुल यांच्या आत्महत्या करन्याचे मागचे कारन अद्याप कळू शकले नसून पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार काळे व प्रशीक जिवने करित आहे . म्रुतक हा आई वडीलांना एकुलता एक मुलगा असून त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
