

सहाय्यक अभियंत्या सह लाईनमन यांचा मनमानी कारभार महिन्याला लाखो रुपयांचा पगार घेऊन हाकलतात उंटावरून शेळ्या जिल्हा अधिकारी यांनी लक्ष देणे झाले गरजेचे.
प्रतिक्रिया
सांगा साहेब सांगा आम्ही शेती करायची की नाही. एका वर्षापासून आमच्या शेतात पडलेले खांब व तुटलेले तार उचलता तरी कधी. आधीच आम्ही सततच्या नापिकीमुळे व गुलाबी बोंड आळी मुळे त्रस्त झालो आहेत यामध्ये अजून एक भर वडकी वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गिरी व संबंधित लाईनमन अतुल काळे यांनी टाकली आहे. या दोघांच्याही दुर्लक्षित धोरणामुळे आज आमची शेती पडीत राहण्याच्या मार्गावर आहे. जर आमची शेती पडीत राहली तर यामधील एखाद्या शेतकऱ्यांच्या मनावर काही परिणाम होऊन एखाद्या शेतकऱ्यांनी कमी अधिक केल्यास याला जबाबदार सहाय्यक अभियंता गिरी व लाईनमन अतुल काळे हे राहतील अरुण भाऊराव गाडगे, दिनकर गुरमुले, हनुमान गाडगे, बाबाराव निकुडे, विनोद गाऊत्रे शेतकरी रिधोरा
राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरामध्ये वडकी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे व संबंधित लाईनमन मुळे परिसरातील जनता त्रस्त झाली असल्याची ओरड सर्व शेतकरी व शेतमजूर सर्व सामान्य माणसांमधून होताना दिसत आहे. सविस्तर वृत्त असे रिधोरा येथे एका वर्षापूर्वी झालेल्या वादळी पावसामध्ये अल्पभूधारक शेतकरी अरुण गाडगे, हनुमान गाडगे, दिनकर गुरनुले, बाबाराव निकुडे, विनोद गाऊत्रे यांच्या शेतामध्ये विद्युत खांब तुटून पडले असून यासंदर्भात वरील सर्व शेतकऱ्यांनी लेखी व तोंडी स्वरूपाची तक्रार संबंधित वडकी वीज वितरण विभागाकडे केली होती. परंतु अजून पर्यंत या शेतकऱ्यांच्या शेतातील पडलेले खांब व तुटलेल्या अवस्थेत असलेले तार हे उचलले नाही. ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत एका वर्षापासून दिसून येत आहे. तर आता टोबणी पेरणीचे दिवस आले असून या शेतकऱ्यांनी करायचे तरी काय ? सदर या शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे दिसून येत आहे. शेती पडीत ठेवली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल कसा कारण या सर्व शेतकऱ्याकडे शेती शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर हीच परिस्थिती रिधोरासह आजूबाजूच्या काही गावामध्ये आहे. यावर मात्र संबंधित लाईनमन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे हा लाईनमन महिन्याला हजारो रुपयांचा पगार घेऊन गावातील खाजगी लाईन मंचा हाताने कामे करून घेत असल्याचे दिसून येत आहे या लाईन म्हणला एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा शेतमजुरांनी फोन केला तर त्यांना उद्धट भाषेत उत्तर हा लाईनमन देतो रात्रीच्या वेळेस गावातील किंवा शेतातील लाईट बंद झाली तर लाईन म्हणला फोन लावल्यास तो उद्धट भाषेत बोलून ही वेळ आहेत का आम्हाला फोन करायची असे बोलून फोन काटून टाकतात मग रात्रीच्या वेळेस लाईट बंद झाल्यास फोन कुणाला करायचा? सदर या परिसरामध्ये काही वर्षापूर्वी शेतातील तुटलेल्या अवस्थेत असलेल्या ताराला स्पर्श होऊन दोन शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता तर असाच प्रकार काही दिवसापूर्वी रिधोरा येथे बेघर वस्तीमध्ये झाला होता सदर अचानक आलेल्या वादळी पावसामुळे बेघर वस्तीमध्ये विद्युत खांब व तारे तुटलेल्या अवस्थेत होती सदर गावामध्ये तार व खांब तुटल्या अवस्थेत असल्यावर तुरंत लाईट बंद करून तुटलेल्याल्या अवस्थेत असलेले तार गुंडाळून ठेवणे ही जबाबदारी संबंधित लाईनमंची असते परंतु ते तार दोन ते चार दिवस तिथेच तुटल्या अवस्थेत होती. अशा परिस्थितीमध्ये एका गावगुंडी वायर म्हणणे ती लाईट चालू केली लाईट चालू होताच त्या तुटलेल्या ताराला एका बकऱ्याचा स्पर्श होऊन तो बकरा जागी ठार झाला होता सदैवाने मनुष्यहानी झाली नाही परंतु ही जबाबदारी सबंधित लाईनमंची असताना सुद्धा या लाईनमने जाणून बुजून दुर्लक्ष केले होते. तर ही अवस्था रिधोरासह आजूबाजूच्या संपूर्ण गावांमध्ये आहे परिसरातील संपूर्ण रोहित्रे उघड्यावर आहे कुठे झाकण नाही तर कुठे ग्रीपा नाही. सबंधित लाईनमन हा कधीच स्वतः काम करत नाही तो फक्त खाजगी लाईनमन कडून काम करून घेत असल्याची ओरड या परिसरातील शेतकरी शेतमजूर यांच्याकडून होताना दिसत आहे. तर वडकी वीज वितरण विभागाचे सहाय्यक अभियंता गिरी व संबंधित लाईनमन अतुल काळे यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी यवतमाळ, तहसीलदार राळेगाव, जिल्हा विद्युत पुरवठा विभाग यवतमाळ व वडकी पोलीस स्टेशन यांना रिसर्च तक्रार करून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे अरुण गाडगे, हनुमान गाडगे, दिनकर गुरनोले, बाबाराव निकुडे, विनोद गाऊत्रे यांनी सांगितले आहे.
