क्षुल्लक वादातून धारदार शस्त्राने हल्ला,खुनाच्या घटनेने हादरला जिल्हा

भद्रावती – तुकाराम भोयर रा.कोंडेगाव यांच्या मुलाची तब्येत चांगली नव्हती त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी तुकाराम भोयर (55)यांनी घनश्याम भोयर (55) ला दुचाकी वाहन मागितले, मात्र घनश्याम ने दुचाकी मागितली परंतु त्याने गाडी देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तुकारामने धारधार शस्त्राने वार केला.त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या घनश्याम चा मृत्यु झाला. या क्षुल्लक कारण हत्येला कारणीभूत ठरले, सदर घटना भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव येथे घडली. मुलाची तब्येत चांगली नसल्याने त्याला दवाखान्यात नेण्यासाठी तुकाराम ने घनश्याम यांना दुचाकी वाहन मागितले, मात्र घनश्याम यांनी दुचाकी दिली नाही . दुचाकी न दिल्याने तुकाराम व घनश्याम यांचा वाद झाला, वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात तुकाराम यांनी घरून धारधार शस्त्र आणत घनश्यामवर वार केल. हा वाद सोडविण्यासाठी घनश्याम यांचा मुलगा मध्ये पडला मात्र त्याच्यावर सुद्धा तुकाराम ने वार केले, या हल्ल्यात शक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला नागपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. क्षुल्लक वादात 55 वर्षीय तुकाराम भोयर यांनी शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय घनश्याम भोयर यांची हत्या केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. आरोपी 55 वर्षीय तुकाराम नारायण भोयर यांना भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच नवनियुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.