राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वडकी ते करंजी दरम्यान विश्वविक्रमी खड्डे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील वडकी येथून जाणाऱ्या नागपूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वडकी ते करंजी दरम्यान पहिल्याच पावसात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत .पण याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे .हा रस्ता बनून अवघे काहीच दिवस झाली आहेत .तर या पावसाळ्यात रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत . वडकी ते करंजी हा २० किलोमीटरचा रस्ता खड्डेमय झाल्याने या रस्त्यात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे . संभंधित कोणत्याही अधिकाऱ्याने रस्त्याची चौकशी न करता आपसी देवाण घेवाण करून हा रस्ता उत्तम दर्जाचा असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचे समजते .
राष्टीय महामार्ग क्रमांक ४४ हा काश्मीर ते कन्याकुमारी असा जातो . यामुळे या मार्गावर हजारो लांब पट्ट्याचे मोठे वाहन धावत असतात . हा महामार्ग असल्याने मोठी वाहने सुसाट वेगाने आपले मार्गक्रमण करीत असतात . पण रस्त्यावरील हे विश्वविक्रमी खड्डे चुकवितांनाया मार्गावर अनेक मोठे अपघात आणि मोठ्या गाड्या पलटीही झाल्या आहेत . शिवाय वडकी, करंजी या ग्रामीण भागातील बहुतांश लोक हिंगणघाट नागपूर हे शहर मुख्य बाजारपेठ असल्याने येथील नागरिक जाण्यायेण्यास लहान वाहनांचा वापर करतात.यामुळे हे खड्डे चुकवितांना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो शिवाय छोटेमोठे अपघात होऊन अनेकांनी आपले प्राणही गमावले आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.