फुलसावंगी प्राथमिक आरोग्यकेंद्रात 24 तासात 5 प्रसुत्या,गोरगरीब महिलांना फुलसावंगी येथीलआरोग्य केंद्र ठरतो आधार

सर्व बालक व माता सुखरूप

क्षमता वाढविण्याची गरज

प्रतिनिधी फुलसावंगी – संजय जाधव

प्रसूती साठी जिल्ह्यात अनेक वेळा प्रथम राहण्याचा बहुमान मिळालेल्या फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील चोवीस तासात यशस्वी सलग पाच प्रसुत्या
करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इतिहासात येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन अध्याय जोडला आहे.विशेष म्हणजे या पाच पैकी तीन कार्य क्षेत्राच्या बाहेरील नांदेड जिल्ह्यातील रुग्ण आहेत. पाच ही बालक व माता सुखरूप आहेत.
मातृत्व ! ही नुसती कल्पनाच किती सुंदर असते. मातृत्व हे एका स्त्रीला परिपूर्ण बनविते. गर्भावस्था; हा स्त्री जीवनातील अत्यंत नाजूक तसेच विलक्षण कुतूहलाचा काळ असतो. हा काळ म्हणजे निसर्गाने स्त्रीला दिलेले वरदानच.मात्र हल्ली च्या काळात प्रसुती चा विषय
अतिशय खर्चिक झालेला आहे. विशेषत ग्रामीण भागात हा प्रश्न जिवा वर बेताव इतका गंभीर प्रश्न आहे. फुलसावंगी परिसरातील महिला रुग्ण पुसद, उमरखेड येथील खासगी दवाखान्याचे पर्याय आहेत. आणि खासगी दवाखान्यात सिजर करण्याचा जास्त भर दिला जातो हा खर्च पन्नास हजाराच्या ही वर जाते अशा परिस्थिती त फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र महिलांसाठी एक आधार बनून समोर आला आहे. येथे वार्षिक 300 ते 400 प्रसूत्या होत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक प्रसूती साठी दिला जाणारा डॉ आनंदी बाई जोशी हा पुरस्कार 2017 साली फुलसावंगी आरोग्य केंद्राला देण्यात आला तर 2023-24 साली जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकवला आहे.ही सेवा अविरत सुरु आहे.
रविवारी 24 तासात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीमा भिसे, अश्विनी राठोड, पूजा धोत्रे, वर्षा घोडगे, संध्या साखरे असे ऐकून पाच यशस्वी प्र सू ती करण्यात आली. विशेष म्हणूजे कमी सोयी सुविधा असताना येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या सकारात्मक कार्यातून सामान्य नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रने वरील विश्वास भक्कम केला आहे.आरोग्य अधिकारी डॉ विठ्ठल सल्लावार, डॉ सर फराज शेख, डॉ अक्षय वाठोरे यांनी परिश्रम घेतले.

सू सज्ज प्रसूती गृहाची गरज –

या ठिकाणी एकाच वेळी दोन- दोन, तीन तीन रुग्ण डिलेव्हरी साठी आलेल्या असतात.मात्र येथे एकच डिलेव्हरी करण्याची सुविधा आहे. अशा वेळी रुग्णांना वाट पाहावी लागते व डाक्टरांची सुद्धा गोची होते.म्हणून या ठिकाणी सुसज्ज अशा प्रसूती ग्रहाची नितांत गरज आहे.

प्रा.आ. फुलसावंगी केंद्राला प्रधान्य क्रम

  • प्रा. आ केंद्राच्या ठिकाणी चोवीस तासात पाच डिलेव्हरी करणे हे खरंच रेअर बाब आहे.या साठी फुलसावंगी आरोग्य अधिकाऱ्यांचा करावा तेव्हडा कोतुक कमी आहे. या ठिकाणी रुग्णांचा फ्लो पाहता प्रा. आ. केंद्राच्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा प्राधान्य क्रमाने दिल्या जात आहेत.

डॉ प्रल्हाद चव्हाण

जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ

रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

  • 24 तासात पाच प्रसूती करणे ही येथील आरोग्य कर्मचारी व सहकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या अथक मेहनती चा उत्तम उदाहरण असून रुग्णांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
    -डॉ विठ्ठल सल्लावार
    आरोग्य अधिकारी, फुलसावंगी