
सहसंपादक: रामभाऊ भोयर
हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यातील वडनेर जिल्हा परिषद सर्कल येथील ओपन राखीव जागेसाठी होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून श्री. गुरुदयालसिंघ जुनी यांचे नाव सध्या प्रबळ दावेदार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
श्री. गुरुदयालसिंघ जुनी हे दीर्घकाळापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी सक्रियपणे कार्यरत असून, पक्षसंघटन, सामाजिक कार्य आणि सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क यामध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. सर्व समाजघटकांना न्याय मिळावा या भूमिकेतून त्यांनी राबवलेली कार्यपद्धती, घेतलेली ठाम भूमिका तसेच जनहिताच्या प्रश्नांवरील सक्रिय सहभागामुळे त्यांना जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील नेते आदरणीय मा. श्री. सुधीर बाबूजी कोठारी (कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट यांचे सभापती व मुंबई बाजार समितीचे संचालक) तसेच माजी आमदार आदरणीय मा. श्री. राजूभाऊ तिमांडे यांच्या नेतृत्वाशी श्री. जुनी यांचे घनिष्ठ संबंध असून, पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय क्षेत्रात श्री. गुरुदयालसिंघ जुनी (माजी ग्रामपंचायत सदस्य, वडनेर) यांची ओळख संयमी, जबाबदार व विश्वासार्ह नेतृत्व म्हणून आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत सातत्य, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची क्षमता प्रकर्षाने दिसून येते. वडनेर, दारोडा, फुकटा तसेच परिसरातील सर्कलमध्ये पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
निवडणूक अनुभवाबाबत सांगायचे झाल्यास, श्री. जुनी यांनी आतापर्यंत तीन ते चार निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
२०१९ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत, अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी जिल्हा परिषद सदस्याच्या पतीचा २१५ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला, ज्यातून जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास स्पष्ट झाला.
त्यानंतर पंचायत समिती हिंगणघाट पोटनिवडणुकीत, त्यांच्या मातोश्रींनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या लढतीत त्या काही मतांनी पराभूत झाल्या असल्या, तरी दुसऱ्या क्रमांकावर राहून त्यांनी सत्ताधारी पक्षासह मात दिली , दोन ते चार प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना कडवी झुंज दिली. सर्वांना मागे सोडून दुसरे क्रमांक वर राहिले
या सर्व पार्श्वभूमीवर, निवडणूक अनुभव, संघटनात्मक ताकद आणि जनाधार लक्षात घेता, वडनेर जिल्हा परिषद सर्कलमधील ओपन जागेसाठी श्री. गुरुदयालसिंघ जुनी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून एक सक्षम, अनुभवी व विश्वासार्ह उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
