रेल्वे वेळापत्रकानुसार उमरखेड ढाणकी हिमायतनगर मार्गे बस सेवा सुरू करा (वंचित बहुजन आघाडीचा रस्ता रोको आंदोलनाचा इशारा)


ढाणकी प्रतिनिधी,प्रवीण जोशी.


गेल्या अनेक वर्षापासून हिमायतनगर रेल्वे वेळापत्रकानुसार सुरू असलेली उमरखेड ढाणकी गांजेगाव हिमायतनगर मार्ग बस सेवा अचानक गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांची अतिशय गैरसोय होत आहे, या मार्गाने रेल्वे प्रवास करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची बस सेवा बंद असल्यामुळे खाजगी वाहन तालुका कडून आर्थिक लूट सुरू आहे, यामुळे मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसत आहे त्या मुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पूर्वीप्रमाणे सुरू असलेली उमरखेड ढाणकी गांजेगाव हिमायतनगर ही बस सेवा पंधरा दिवसाच्या आत सुरू न झाल्यास अन्यथा या मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने उमरखेड आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव जॉन्टी विणकरे , तालुकाप्रमुख संतोष जोगदंडे, नगरसेवक संबोधी गायकवाड, देवानंद पाईकराव विनोद बर्डे राजेश गायकवाड बाबुराव नवसागरे उपस्थित होते