
सहसंपादक : रामभाऊ भोयर
भारतीय जनता पार्टी राळेगावच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने शक्ती केंद्रप्रमुख व बुथ प्रमुख यांची कार्यशाळा आज राळेगाव येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री कैलासभाऊ बोंद्रे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष सौ. छायाताई पिपंरे होत्या. यावेळी व्यासपीठावर अनिभाऊ राजूरकर, प्रशांतभाऊ तायडे, सौ. प्रितीताई काकडे, अनिलभाऊ नंदुरकर, अभिजितभाऊ कदम, संदीपभाऊ वैद्य, डॉ. कुणाल भोयर, बबनरावजी भोंगारे, भास्करराव मानकर, शुभमभाऊ मुके, राजूभाऊ गुंदेजा, विनोद माडवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक अभिजितभाऊ कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसादभाऊ ठाकरे यांनी केले. या कार्यशाळेत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन मजबूत करणे, बुथस्तरीय नियोजन, मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी तालुका महामंत्री, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, जिल्हा परिषद गट प्रमुख व सहगटप्रमुख, पंचायत समिती गणप्रमुख व सहगणप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
