शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा 2023चे वाटप DBT खात्यावर

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड
मो.7875525877

खरीप पिक विमा 2023 चे वाटप सुरू झालेले आहे. बँक खात्यावर जमाही झालेले आहेत परंतु अनेक शेतकरी पिक विमा जमा होण्याची वाट पाहत आहेत.
पिक विमा जमा होण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच पिक विमा जमा होईल त्यासाठी काही बाबी लक्षात ठेवाव्यात
पिक विमा हा आधार लिंक खात्यात जमा होत आहे (DBT)
थोडक्यात आपले पीएम किसान चे दोन हजार रुपये ज्या बँकेत जमा होतात त्याच बँकेत हा पिक विमा जमा होत आहे.
पिक विमा भरताना जरी आपण वेगळे बँक खाते दिले असले तरी आधार लिंक खात्यातच पैसे वर्ग करण्याचे काम सुरू आहे.
यावर्षी पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असून अर्जंचे व्हेरिफिकेशन करताना विमा कंपनीला विलंब होत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा होत आहे बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होईल
आपल्या पिक विमा

.आपले आधार कोणत्या बँकेत लिंक आहे ते खालील लिंक वर क्लिक करून तपासू शकता
काही पिक विमा अर्ज मध्ये त्रुटी असल्यामुळे जसे कि सामायिक जमिनीचे खाते, अपुरी कागदपत्रे, आधार लिंक नसलेली बँक खाती यामुळे पीक विमा जमा होताना अडचणी येत आहे.

आपणास पीक विमा संदर्भात काही समस्या असल्यास आपल्या विमा पावतीवर असलेल्या विमा कंपनीच्या टोल फ्री नंबरवर कॉल करून आपल्या शंकचे निरसन करू शकता.
किंवा
ई-मेल वर शंका विचारू शकता
तरी शेतकरी बांधवाना विनंती आहे कि घाबरून न जाता प्रत्येकाला पीक विमा लवकरच मिळणार आहे.