
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक ५ऑक्टोबर २०२५रोजी राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड.रोशनी वानोडे (सौ कामडी) यवतमाळ जिल्हा संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुख्य अतिथी श्रीमती राजश्री मडावी मॅडम नेताजी हायस्कूल राळेगाव यांनी प्रतिमेचे पूजन करून मुलांना मार्गदर्शन केले व वस्तीगृह परिसरात वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली तसेच एड. रोशनी वानोडे सौ कामडी यांनी नशाबंदी मंडळातर्फे पत्रक वाटप केले. मुलांना व्यसनमुक्ती संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आदिवासी गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली विद्यार्थ्यांनी राणी दुर्गावती यांच्या विषयी व्याख्यान दिले . कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह राळेगाव येथील गृहपाल श्री एस. ए .कावरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता अमोल सायरे, नम्रता कावरे, चरेन्द्र चांदेकर, रोहित मानगी,आदिश्री कावरे, कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.