
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
बाल दिन व शहीद दिनानिमित्त भारतासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या चार साहेबजाद्यांच्या स्मरणार्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हिंदू धर्म व राष्ट्राच्या रक्षणासाठी चार साहेबजाद्यांनी दिलेल्या महान बलिदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा दिवस बाल दिन म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमांच्या माध्यमातून सेवाभाव, देशभक्ती व बलिदानाची प्रेरणा जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
बाल दिनानिमित्त दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी गुरुद्वारा श्री गुरुनानक संगत साहेब प्रबंध कमिटी, वडनेर यांच्या वतीने विविध सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. तसेच ग्रामीण रुग्णालय, वडनेर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. यासोबतच वडनेर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दूध, बिस्किटे व फळांचे वाटप करण्यात आले.
तसेच बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्याजवळ नागरिकांसाठी दूध लंगर तसेच बिस्किटे व फळांचे वितरण करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमांमुळे गावात सामाजिक ऐक्य, मानवता व एकतेचा संदेश पोहोचला.
यावेळी विविध ठिकाणी चार साहेबजाद्यांच्या बलिदानाची प्रतिमा प्रदर्शित करून त्यांच्या अद्वितीय योगदानाची माहिती नागरिकांना देण्यात आली. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या अस्मितेसाठी चार साहेबजाद्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची जाणीव बाल दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
बाल दिनानिमित्त प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच वडनेर ग्रामपंचायत येथे चार साहेबजाद्यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. तसेच हिंगणघाट येथे विविध नेतेमंडळींनाही या प्रतिमा सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्या.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री समीरभाऊ कुणावार, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे सभापती मा. श्री सुधीरबाबूजी कोठारी, माजी आमदार मा. श्री राजूभाऊ तिमांडे, निमू घटवई वडनेरचे अध्यक्ष मा. श्री राजेंद्र डागा, ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाटचे अध्यक्ष मा. श्री गिरधरबाबू राठी, तसेच इंदिरा गांधी विद्यालय वडनेरचे अध्यक्ष मा. श्री कृष्णाजी महाजन यांना चार साहेबजाद्यांच्या प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
या सर्व उपक्रमांचे आयोजन गुरुद्वारा श्री गुरुनानक संगत साहेब प्रबंध कमिटी, वडनेर चे अध्यक्ष गुरुमुखसिंघ जुनी, उपाध्यक्ष गुरुदयालसिंघ जुनी, कोषाध्यक्ष संगतसिंघ जुनी, सचिव सेवकसिंघ बावरी, कार्याध्यक्ष विजेंद्रसिंघ जुनी, प्रवक्ता रायबहादुरसिंघ जुनी, संघटक प्रेमसिंघ जुनी, ग्रंथी जर्नलसिंघ टाक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, महिला, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी या प्रेरणादायी व सेवाभावी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
