
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात उपक्रमशील शाळा म्हणून लौकिक असलेल्या जि. प. उ. प्रा. शाळा सावंगी च्या शिरपेचात पुन्हा एका बहुमानाची भर पडली.कबबुलबुल स्पर्धेत सावंगी (पे ) शाळेच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवत प्रथम क्रमांक पटकवला.
तालुकास्तरीय कबबुलबूल मेळावा पंचायत समिती राळेगाव यांच्यावतीने प्रतिभा आश्रम शाळेत घेण्यात आला. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका यांनी बुलबूल मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला. स्वराली फाले हिला ध्वजारोहणाची संधी प्राप्त झाली. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत स्वराली फाले, रूद्राक्षी सामृतवार, रिद्धी सामृतवार,पलक ऊईके , वेदांगी वानखडे, सुहानी सहारे या विद्यार्थ्यींनी उत्तम प्रकारे आपले वर्चस्व प्रस्थापित करत विजयाचा चषक शाळेला मिळवून दिला. बूलबूल पथकाच्या मार्गदर्शक शिक्षिका सोनल नासरे , रेखा कोवे, अर्चना सुरजुसे यांनी बुलबूल पथकाची उत्कृष्ट पद्धतीने तयारी करून घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ भारती ताठे या सर्व विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहित करत असतात. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय केशव पवार साहेब, गटशिक्षणाधिकारी माननीय नवनाथ लहाने, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय निलेश दाभाडे, केंद्रप्रमुख डॉ कल्पना डवले मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.
