
वरोरा शहरातील नामांकित SS Mobile शॉपी मधिल धाडसी चोरी प्रकरणाचा वरोरा पोलीसांनी केला पर्दाफाश वरोरा मार्केट मध्ये असलेले एस.एस. मोबाईल शॉपी दुकाणत रात्री चे वेळी दुकाणाचे शटर तोडुन अज्ञात आरोपीतांनी चोरी करुन दुकाणातील १०,७१००० रुपयाचे मोबाईल चोरी केल्याबबात तक्रार दिली वरुन पोलीस स्टेशन वरोरा येथे अप.क्र.८८३/२०२५ कलम ३३१ (४) ३०५ बी. एन. एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
“
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस स्टेशन येथिल तपास पथक याना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून पोलिस ठाणे वरोरा ने तपासाची चक्रे फिरवुन पो.स्टे. परीसरातील सी.सी.टि.व्ही फुटेज व वरोरा शहरात पाहनी केली जवळपास १०० चे वर वरोरा शहरातील दुकाणचे व घरांचे सी. सी. टी. व्ही. फुटेज पाहनी करुन गोपनीय माहितीचे आधारे सदर गुन्हयातील आरोपी बाबत माहिती घेण्यात आली असता सदर गुन्हयात अल्पवयीन बालक हा ता. अजंनगाव सुर्जी जि. अमरावती येथिल असल्याचे समजले वरुन सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता त्याचे ताब्यात गुन्हयातील १७ मोबाईल फोन मिळुन आले तसेच त्यांचे चौकशी मध्ये वरोरा तालुका येथिल एक अल्पवयीन बालक असल्याचे दिसुन आले त्याचा शोध घेतला असता त्याचे ताब्यात गुन्हयातील एक मोबाईल फोन मिळुन आला तसेच त्यांचे ताब्यात ईतर सोहित्य मिळुन आले असा एकुन दोन्ही वि.स. बालक यांचे कडुन सदर गुन्हयात ८,००,००० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
,
सदरची कारवाई मा. श्री. पोलिस अधिक्षक सा., चंद्रपूर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. संतोष बाकल उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे वरोराचे ठाणेदार अजिंक्य तांबडे, यांचे नेतृत्वात सपोनी शरद एस. भस्मे,, पोहवा दिलीप सुर, पोहवा संदिप मुळे पोहवा प्रशात नागोसे, पोहवा यादव , पो. अं. / मनोज ठाकरे पो.अ. महेश गावतुरे , पोअ.सौरभ कुल , यांनी केली आहे.
