रुग्णांना सावली देणारी झाड जमीनदोस्त, ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारनामा
[ बहरलेली झाड कापल्याने रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय )

झाडें लावा, झाडें जगवा ही मोहीम झाडें लावा पुरती पाळल्या जाते, मात्र झाडें जगवा या महत्वाच्या बाबीवर कायम दुर्लक्ष होते हा अनुभव नवा नाही. राळेगाव तालुक्यात तर ग्रामीण रुग्णालयाच्या बहाद्दरांनी जगवलेली, बहरलेली झाडेंच तोडून झाडें तोडा हा नवीन पॅटर्न राबविला आहे. ग्रामीण रुग्णालय परिसरातील सावली देणारी झाडेच कापून टाकण्याचा अजब कारनामा नुकताच उघडकीस आला.
राळेगाव तालुक्यातील गोर -गरीब रुग्णांकरिता ग्रामीण रुग्णालय हा एक महत्वाचा पर्याय आहे. या ठिकाणी रुग्णांची कायम गर्दी असते रुग्णालयाच्या आवारात रुग्ण त्यांचे नातलग यांच्या करीता सावलीत बसायची सोय या झाडांमुळे होत होती. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाच वर्षा आधी ही झाडें लावली. ती जगवण्यात अनेकांचा हातभार लागला ट्रामा सेंटर लगत व परिसरात अशी चार झाडें चांगलीच बहरली होती. अनेक रुग्णांना अभ्यागताना सावली देण्याचे कामं ही झाड करत होती. नुकतीच ही झाड तोडण्यात आली. या ठिकाणी स्ट्रेचर देखील राहात होते अत्यवस्थ रुग्णांना लगेच स्टेचर उपलब्ध होत होते.
परिसरातील जगलेली झाड तोडून परिसर बोडखा करून ग्रामीण रुग्णालयाने काय साध्य केले कळण्यास मार्ग नाही. आता नवीन झाडें लावली तरी ती जगेल का, जगली तरी त्या झाडांची सावली मिळण्यासाठी किती कालावधी लागेल या बाबत अनिश्चित्तता आहे. विनाकारण विळ्याचा खिळा करण्याची वृत्ती रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी व्यक्त केली.



गेल्या पाच वर्षा आधी ग्रामीण रुग्णालयात अनेकांच्या सहकार्याने झाडें लावली होती. वर्षाचे सात -आठ महिने आपल्याकडे उन्हाच्या झळा सहन करण्याचे असतात. त्यातही ग्रामीण रुग्णालया बाहेर बसण्यास सेड नाही कोणतीही व्यवस्था नाही पुढे रस्ता आहे त्या मुळे गोर -गरीब रुग्ण त्यांचे नातेवाईक या झाडाखाली बसत होते. जेवण करत होते. विनाकारण ही झाडें तोडण्यात आली. या बाबत कुणाची परवानगी घेतली घेतली असेल तर कोणत्या आधारावर देण्यात आली कळण्यास मार्ग नाही. आज ग्रामीण रुग्णालयात गेल्याबरोबर परिसर बोडखा झालेला पाहून खूप दुःख झाले. या कृत्याचा जाब विचारल्या जाईल.


शशिकांत उर्फ बाळू धुमाळ
नगरसेवक न. प. राळेगाव