
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील ७३ ग्राम पंचायती मधील मनरेगा कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रकिया महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण सोसायटी मार्फत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ग्रामपंचायत व तहसील यंत्रणा द्वारा केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया सन २०२२ – २३ याआर्थिक वर्षातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत झालेला कामाची दिनांक १९ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ग्राम पंचायत स्तरावर नरेगा अंतर्गत विविध यंत्रणांमार्फत करण्यात आलेल्या कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात आले यात लेखापरीक्षण/दस्ताऐवज तपासणी, १००% जॉब कार्ड तपासणी, बँक पासबूक तपासणी, सर्व मग्रारोहयो कामाची स्थळे भेट, मोजमाप करणे Current-ongoing work side भेटी, ग्रहभेटी, मजूरगट चर्चा भेटी, MIS वरील माहितीची तुलनात्मक तपासणी, सिंचन विहीर, घरकुल, शौचालय, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, शोषखड्डे, सलग समतल चर, रोपवाटिका, सार्वजनिक रस्त्यांवरील वृक्ष लागवड, तुती लागवड, फळबाग लागवड इत्यादी कामांचा समावेश आहे व कामाची पाहणी करून जन-जागृती करण्यात आली असून प्रक्रिया दरम्यान आले आलेल्या मुद्याचे वाचन ग्रामसभेत करून काही मुद्दे त्या ठिकाणी खारीज करून पुढील मुद्दे तालुका स्तरावर जनसुनावणी पुढे ठेवण्यात आले तालुक्यातील ७३ ग्राम पंचायत ची जनसुनावणी दिनांक २२ फेब्रुवारी पंचायत समिती सभागृहात जिल्हा तक्रार निवारण अधिकारी तथा जनसुनावणी पॅनल अध्यक्ष अ.ब.अढागळे, कार्यक्रम अधिकारी नरेगा तहसीलदार, गटविकास अधिकारी पवार, पत्रकारसंघ अध्यक्ष मोहन देशमुख, निलेश राठोड उपाध्यक्ष केसुला फाउंडेशन संस्था प्रतिनिधी, ॲड.चेतन गलाट, मजूर प्रतिनिधी मैना मेश्राम जनसुनावणी पॅनल यांच्या उपस्थितीत मध्ये जनसुनावणी घेण्यात आली यावेळी जिल्हा साधन व्यक्ती प्रफुल्ल जाधव,नरेगा विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश वाईकर, पोटीओ बाळासाहेब बेहरे, स्वप्नील टाले, व विविध यंत्रणा प्रमुख यांच्या उपस्थिती ७३ ग्राम पंचायत २४२ मुद्यांचे वाचन अतिशय शांतपणे करून काही मुद्दे याच ठिकाणी खारीज करण्यात आले तर काही मुद्दे तालुका स्तरवर समिती स्थापन करून पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले काही मुद्दे पुढील पडताळणी करीत सामाजिक अंकेक्षण सोसायटी मुंबई येथे पाठवण्यात आले यावेळी सर्व ग्रामसेवक, रोजगार सेवक, नरेगा योजना संबंधित यंत्रणांचे सर्व अधिकारी उपस्थित जनसुनावणी अतिशय शांतता पणे सर्व मुद्याचे पारदर्शक पध्दतीने सर्व पुरावे मांडण्यात आली यावेळी जनसुनावणी सोबत नरेगा योजना व कायदा बाबतीत सखोल मार्गदर्शन करण्यात यावेळी ग्रामसेवक संघटना यांनी यापुढे सर्व दस्तऐवज व्यवस्थित ठेवण्याची ग्वाहीही देण्यात आले.
