
सहसंपादक: रामभाऊ भोयर
म.रा.किसान सभेच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन बाभुळगाव तहसिल कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.मोर्चाचे नेत्रुत्व राज्य उपाध्यक्ष काॅ.अनिल घाटे,राज्य कौंसिलर काॅ.अनिल हेपट,काॅ.गुलाबराव उमरतकर,भाकपचे राज्य कौंसिलर काॅ.दिपक माहुरे,अमरावती जिल्हा सचिव काॅ.सुनिल मेटकर,काॅ.हिम्मतराव पाटमासे यांनी केले.शेतकरयांची संपुर्ण कर्जमाफी झाली पाहिजे,शेतमालाची खरेदी नाफेड व सिसीआय मार्फत हमी भावात करण्यात यावी,शेतमाल विक्रीचा हमीभावाचा 20% भावाचा वाढीव फरक देण्यात यावा,शेतीचे पांदन रस्ते दुरुस्त करुन द्यावे,शेतकरयांच्या मुलांना मोफत शिक्षण व बसेसचे मोफत पासेस देण्यात यावे,लाडक्या बहिणीला 1500 ऐवजी 2100 रुपये देण्यात यावे तसेच
नियमित कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2025-26 वर्षात 0% ( शुन्य टक्के) व्याजदराने कर्ज वसुली करण्यात यावी या सह इतरही मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहे मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते अशी माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे कॉ.दिवाकर नागपुरे यांनी कळविली आहे.
