
प्रतिनिधी:प्रवीण जोशी,ढानकी
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद हे खाजगी कामानिमित्त उमरखेड येथे आले असता येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले, येणाऱ्या नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात व पक्ष संघटना वाढवणे सत्तेपासून असलेल्या वंचित समूहाला वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील करून घेणे व विविध विषयावर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले ,येत्या काही दिवसात उमरखेड शहरातील मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करणार असल्याचे सुद्धा उपस्थित मुस्लिम कार्यकर्त्यांनी सांगितले, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी तथा प्रशांत विणकरे ,जिल्हा महासचिव डि के दामोदर , तालुकाप्रमुख संतोष जोगदंडे, नगरसेवक संबोधी गायकवाड, तालुका महासचिव देवानंद पाईकराव,प्रभारी शहर प्रमुख संभाजी मुनेश्वर, विडूळ शाखाप्रमुख रवींद्र हापसे, मौलाना हुसेन, तजमुल शहा , समीर जावेद, शकील अहमद, शेख अलीम, खलील भाई व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते
