
सहसंपादक, : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या चर्चेत असणाऱ्या शंतनू देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सर्व बाजूने व्हावा या मागणी करिता व प्रमुख सूत्रधार कोण यास शोधून त्याला कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी सहकार भवन येथे झालेल्या सर्व सामाजिक व शैक्षणिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सामाजिक व शैक्षणिक संघटनांची 29 रोजी सहकार भवन येथे सभा संपन्न झाली. या सभेमध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे विदर्भाचे नेते अरविंद देशमुख यांच्या मुलांची निर्गुण हत्या करण्यात आली होती .या खुनाच्या निषेधार्थ या संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.
सदर खुनामागील मुख्य सूत्रधार कोण? याची माहिती अजून पर्यंत दिली नाही. त्याबाबत पोलीस प्रशासनाने कडक तपास करावा तसेच या हत्येमागील वापरण्यात आलेली लहान लहान मुलांना कुठले आमिष दाखवून या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेत याबाबतची अजून पर्यंत तपासणी करण्यात आलेली नाही. गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करून पोलीस मोकळे झालेत का? असाही प्रश्न यावेळी निर्माण करण्यात आला. वयाने लहान असणाऱ्या मुलांचा वापर कसा केला गेला? विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये असणारी महिला हिने हत्येचा कट या अगोदर रचला होता का? तो किती दिवसापूर्वी कट रचला तसेच मुले आणि आरोपी यांच्यामधील असणारे संवाद कसे झाले त्यांच्या मोबाईल मध्ये असणारी चाट पोलिसांनी तपासून सदर खुणाचा उलगडा करावा अशी मागणी करण्यात आली. या हत्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे? त्याची माहिती तपासाअंती येऊन समाजासमोर यावी जेणेकरून अशी घटना पुन्हा होऊ नये याबाबतची सुद्धा मागणी करण्यात आली.
या हत्याकांडा मागे अटक केलेल्या आरोपी व्यतिरिक्त अजूनही आरोपी मास्टरमाईंड असण्याची शक्यता समाजामध्ये व्यक्त केल्या जात आहे असा मास्टरमाईंड आहे का वाचल्यास त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी सर्व संघटनांनी केली याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातल्या व सामाजिक क्षेत्रातल्या जवळजवळ तीच संघटनांचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते सपेनंतर मृत शंतनू अरविंद देशमुख डॉक्टर गायत्री सतीश काळे व समीक्षा गौतम आहाटे यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
