अतिवृष्टी ची मदत दिवाळी आधी भेटल का ❓,शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल

प्रवीण जोशी (प्रतिनिधी)
ढाणकी…..


उमरखेड तालुक्यातील ढाणकी महसूल मंडळात गेले जुलै ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या नुकसानीतून सावरण्यासाठी सरकारने स्थानिक प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. पण शासनच आपली खुर्ची टिकवण्यासाठी न्यायालयाचा लढा लढत आहे त्यामुळे खरंच दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला मदत मिळेल का हा मोठा प्रश्न आहे. तसेच ही मदत मिळाल्यास रब्बी हंगामाला सुद्धा शेतीची मशागत करण्यासाठी ही रक्कम कामी येईल जर एका एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन चा उतारा येत असेल तर रब्बी हंगामातील मशागतीसाठी लागणारा खर्च सुद्धा निघत नाही. ही सुद्धा एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. तलाठी कृषी सहाय्यकांनी पंचनामे करून अहवाल प्रशासनाला सादर केले प्रशासना कडून निधी सुध्दा उपलब्ध झाला मात्र या कामावर तलाठ्याने बहिष्कार टाकला होता त्यानंतर आयुक्तांनी आदेश काढून तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांना कामे देण्यात आले यापैकी काहींनी कामाला सुरुवात केली मात्र अजूनपर्यंत तरी ढाणकी परीसरातील एकाही ग्रामपंचायत मधे नोटीस बोर्डावर याद्या प्रसिद्ध करण्यात आले नसल्याने शेतकरी मोठ्या संभ्रमात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचा दसरा सण तर अंधरात गेला मात्र दिवाळी तर जोरात होईल का याकडे शेतकऱ्यांचे नजर लागले आहे.