
हेल्मेट न घातल्याने आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली आहे. ही मोहीम संपूर्ण तालुक्यात अत्यंत कडकपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले असून तालुक्यातील नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट घालूनच प्रवास करावा. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांनी दिला आहे.
“वाहतूक शाखा प्रमुख API सीता वाघमारे यांनी सर्वात आधी आपल्या(पोलीस प्रशासन) सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येत असताना किंवा कर्तव्य बजावतांना हेल्मेटसक्ती केली का ? असाही सवाल जनतेतून करण्यात येत आहे.जर पोलिसानीच हेल्मेट घालावे तर अशी इच्छा जनेतेतून बोलली जात आहे. ही मोहीम किती दिवस सुरू राहील आणि किती आळा बसेल हे देखील पाहणे गरजेचे.”
वणी शहरातील ट्राफिक पोलीस महेश राठोड यांनी वणी शहरातील दुचाकी स्वारांना कमी वेगात गाडी चालविण्याचा व हेल्मेट घालत गाडी चालविण्याचा सल्ला देत असल्याने जनतेतूनही त्यांच्याबद्दल ,वाहतूक शाखेबद्दल चांगली भावना निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे
