बिटरगाव पोलीस स्टेशन येथे ठाणेदार सुजाता बनसोड रुजू होताच हातभट्टीवर कारवाई



उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड


विदर्भ व मराठावाड्याचे शेवटचे टोक म्हणून प्रसिद्ध असलेले बिटरगाव पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त ठाणेदार म्हणून रुजू झालेले एपी. आय. सुजाता बनसोड यांनी चार्ज घेत्ताच बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात हातभट्टी वर कारवाई केली आहे. शेख इस्माईल शेख मस्तान, मिराबाई कांबळे, हे दोन्ही टेबेश्वर नगर, ढाणकी येथील रहिवासी असुन या अवैध देशी दारुचे विक्रेते व कुसीबाई आनंदा राठोड, राहणार मन्याली या हातभट्टी विक्रेता व कैलास मोरे राहणार इसापूर हे हातभट्टी हे विक्रेते असुन या चारही आरोपीवर, चार वेगवेगळ्या ठिकाणी धाड टाकून बेधडक कारवाई केली आहे. त्यामध्ये एकूण पाच हजार एकशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या दोषीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे कलम 65(ई )गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई नवनियुक्त ठाणेदार सुजाता बनसोड यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार गजानन खरात, साहेब, बीट जमादार मोहन चाटे, बीट जमादार विधा राठोड, व पोलीस कॉनस्टेबल निलेश भालेराव प्रकाश मुंडे जाधव यांनी केले .