
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत समुद्रपुर तालुक्यातील आजदा परिसरात आरसीडब्लू बांधकाम प्रणालीच्या दोन पुलांचे विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते आज दि.३० रोजी लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य तथा शिक्षण सभापती मृणालताई माटे,समुद्रपुर पंचायत समिती सभापती सौ.सुरेखाताउ टिपले,पंचायत सामिती सदस्य सुनीलभाऊ डुकरे,आजदा ग्रामपंचायतीच्या सरपंचा श्रीमती विमलताई मुंगल,उपसरपंच सचिनभाऊ पेंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आजदा तसेच परिसरातील गावकरी आणि विद्यार्थ्यांना येथे पुल नसल्याने रस्त्याची मोठी अड़चण निर्माण झाली होती, गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी या पुलाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याने जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०१९-२० मधे सुमारे २० लक्ष रुपये निधी मंजुर करविला होता.
आज या दोन्ही पुलांचे काम पूर्णत्वास आले असून शेतकरी, शेतमजूर,विद्यार्थ्यांना वाहतुकीसाठी खुले करीत लोकार्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सर्वश्री महादेवराव पेंदे , योगेशजी मांडवकर,अंकुशभाऊ खुरपडे, सुनीलभाऊ डोंगरे ,कैलासजी टिपले, रवीजी मांडवकर, ईश्वरजी पेंदे, विलासजी मांडवकर, विलासजी काटकर ,रवीजी मुंगल, प्रवीणजी पेंदे, चेतनजी मांडवकर, नारायणजी मांडवकर इत्यादींसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
