
सहसंपादक: रामभाऊ भोयर
विदर्भ पटवारी संघ नागपूर शाखा यवतमाळ उप शाखा राळेगाव येथील ग्राम महसूल अधिकारी यांचे आज दिं.३१ डिसेंबर २०२५ रोजी प्रमुख मागण्या संदर्भात तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या एक दिवसीय धरणे आंदोलनात (१) अनेक वर्ष प्रलंबित असलेली ग्राम महसूल अधिकारी संवर्गाची एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी,
(२)ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला मंडळ अधिकारी संवर्गात तात्काळ पदोन्नती देण्यात यावी
(३) ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला लॅपटॉप स्कॅनर सहित प्रिंटर उपलब्ध करून द्यावे
(४) कालबद्ध पदोन्नतीची प्रकरणे त्वरित निकाली काढावी तसेच संवर्गाची इतर प्रलंबित सेवाविषयक न्याय मागण्या निकाली काढण्यात यावे आदी प्रमुख मागण्या बाबत तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले असून याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते
