मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवा निवृत्त रोखपाल किशोर पवार यांचा सत्कार

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील
वाढोणा बाजार येथील मध्यवर्ती सहकारी बँकेचे रोखपाल किशोर रामभाऊ पवार यांचा सत्कारसविस्तर वृत्त असे रिधोरा येथील रहिवासी असणारे किशोर रामभाऊ पवार हे पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा ( धरण) येथील मध्यवर्ती बँक मध्ये वॉचमन म्हणून कार्यरत होते त्यानंतर त्यांचे प्रमोशन होऊन ते वडकी शाखेला लिपिक म्हणून त्यांची बढती झाली होती तर त्यानंतर त्यांचे परत प्रमोशन होऊन त्यांना वाढोणा बाजार शाखेला रोखपाल म्हणून देण्यात आले होते सदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 32 वर्षाचा कार्यकाल हा चांगल्या पद्धतीत निघून गेल्याने त्यांचा ३० सप्टेंबर रोजी वाढोणा बाजार येथील शाखा व्यवस्थापक सुनील मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्तीचा कार्यक्रम शाल श्रीफळ देऊन संपन्न झाला यावेळी रवी किन्नाके, तेजेस सरोदे, संजय भोयर, मंगेश गोंडे, विनोद ठाकरे, विठ्ठलराव जीवने, किशोर कांडूरवार, प्रकाश पोपट, पुरुषोत्तम चिडे, नितीन भगत, निमुज पवार, संदीप पवार उपस्थित होते