किरण कुमरे व वसंत पुरके यांच्यात उमेदवारी बाबत टस्सल?
[ राळेगाव साठी साऱ्यांची दिल्ली कडे धाव ]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस मध्ये नवा चेहरा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांची दावेदारी निश्चित असल्याचा सरांच्या समर्थकांचा दावा आहे. मात्र आदिवासी व सर्वसामान्य माणसाकरीता मोर्चे, आंदोलने करून किरण कुमरे यांनी मतदार संघात एक वादळं निर्माण केले.काँग्रेस प्रती एकनिष्ठता व मागील दहा वर्षांपासून जनसेवा करीत असल्याने उमेदवारी साठी त्यांचे नाव चर्चेत आहे. प्रा. वसंत पुरके व किरण कुमरे यांच्यात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा मतदार संघात रंगली आहे.
काँग्रेस विचारधारा असणारा मतदार किरण कुमरे यांच्या बाजूने एकवटल्याचे बोलले जाते .लोकसभेचा निकाल व महायुती शासनाच्या तुघलकी धोरणा मुळे या मतदार संघात काँग्रेस उमेदवारी करीता अनेकजन उत्सुक आहे.मात्र सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार किरण कुमरे की वसंत पुरके यांच्यातच उमेदवारी बाबत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
राळेगाव, कळंब, बाभुळगाव या तीनही तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविल्याने किरण कुमरे यांची
”कामाचा माणूस ‘ ही ओळख सम्पूर्ण मतदार संघात निर्माण झाली.काँग्रेस चे माजी मंत्री यांच्या प्रती तरुण वर्गात नाराजीची भावना दिसते.. काँग्रेस ने या वेळी नवा चेहरा दयावा अशी मागणी तरुण वर्गातून होतांना दिसते. किरण कुमरे हे पक्षा प्रती एकनिष्ठाता व तरुण वर्गात विविध समजपयोगी उपक्रम राबवित असल्याने या आघाडीवर उजवे ठरत आले .महाआक्रोशमोर्चात ही ते आघाडीवर होते काँग्रेस हजारो समर्थकांनी त्यांना पाठींबा दिला.किरण कुमरे यांचा सहभाग यात महत्वाचा ठरला. मुंबई व दिल्ली येथे काँग्रेस च्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी बैठका झाल्या सर्वांनी किरण कुमरे यांना ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. किरण कुमरे यांच्या मुळे प्रा. वसंत पुरके याना थेट दिल्ली पर्यंत धावाधाव करावी लागत असल्याची माहिती आहे.
कापसाला 10 हजार रु. क्विंटल भाव दया, सोयाबीन ची खरेदी केंद्र त्वरित सुरु करा आदी महत्वाच्या मागण्यासह शासनाच्या धोरणावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली.गेल्या काही महिन्यापासुन राळेगाव विधानसभा मतदार संघात अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी करीता विविध फ़ंडे वापरास सुरुवात केली. जन आक्रोश मोर्चात मात्र केवळ किरण कुमरे हेच आघाडीवर राहिले प्रा. वसंत पुरके व त्यांच्यातच उमेदवारी बाबत स्पर्धा आहे हे तेव्हाही दिसलें होते.त्या मुळे तालुक्याच्या कार्यकर्त्यांपर्यंत जो मॅसेज गेला तो महत्वाचा आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके नंतर किरण कुमरे हेच उमेदवारी च्या स्पर्धेत आहेत असा संदेश पद्धतशीर वरिष्ठ नेत्यांनी दिला होता तो आता खरा ठरतांना दिसतो.त्यातही माजी मंत्री यांच्या पेक्षा नवीन चेहरा म्हणून किरण कुमरे यांना अधिक पसंती असल्याची जनभावना मतदार संघात आहे..
गेल्या अनेक वर्षा पासुन राळेगाव मतदार संघात समजसेवेचा वारसा त्यांच्या कडे आहे. शिक्षित युवक -युवती साठी मार्गदर्शन वर्ग,सामूहिक विवाह मेळावे, व जनतेसोबत थेट स्थानिक सपंर्क या त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात.आदिवासी सेवक म्हणून त्यांना शासनाने सन्मानित केले.
मतदार संघात सातत्याने कार्यरत असणारा, काँग्रेस पक्षाशी जुळलेला उमेदवार हा निकष लावण्यात यावा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे. कृषी, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी आत्महत्या, कापसावर प्रक्रिया उद्योग या आघाडीवर मतदार संघात कोणतेही ठोस काम झालेले नाही.
किरण कुमरे यांनी 17 वर्ष शिक्षकी पेक्षात सेवा दिली. उच्च विद्याविभुषीत असल्याने व सर्वांना सोबत घेऊन चालणारा माणूस या आघाडीवर ते इतरांपेक्षा सरस ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. काँग्रेस ने या वेळी जुनाच उमेदवार दिल्यास काँग्रेस ला नुकसान होऊ शकते अशी प्रतिक्रिया तरुण वर्गात व सर्व सामान्य माणसाच्या चर्चेत असतांना आता काँग्रेस मध्ये प्रा. वसंत पुरके की किरण कुमरे यांच्यातच उमेदवारी बाबत स्पर्धा असल्याची सूत्रांची माहिती आहे.