आंजी येथे बिरसा मुंडा पुतळ्याचे अनावरण व महाप्रबोधन मेळावा

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील सावनेर येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या आंजी येथे दिनांक 1/1/2023 रोज रविवारला महामानव क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भव्य प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्याच वेळी बिरसा मुंडाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटक काॅंग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अडव्होकेट प्रफुल्ल मानकर होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ मडावी संस्थापक बिरसा क्रांती दल उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष संजय देशमुख हे होते.तर निमंत्रक म्हणून आदिवासी सेवक, महासचिव बिरसा क्रांती दल महाराष्ट्र तथा जिल्हा सरचिटणीस काॅंग्रेस कमेटी यवतमाळ जिल्हा किरण कुमरे उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी महामानव बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.या कार्यक्रमात प्रफुल्ल मानकर, दशरथ मडावी,किरण कुमरे, बळवंत मडावी या सर्व नेत्यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या कार्याला उजाळा दिला.या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सोबतच काॅंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांनी बिरसा मुंडाच्या कार्यावर प्रकाश टाकला.सोबतच आंजी गावात त्याच दिवशी बिरसा मुंडाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.त्यावेळी आंजी गावात अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पिंपरे यांनी केले तर आभार योगेश कन्नाके यांनी मानले. या कार्यक्रमाला ताराबाई श्रीधर सोयाम सरपंच आंजी, पांडुरंग सोयाम,श्रावण कुडमथे, अशोक मडावी, श्रावण मोरे, भाऊराव मडावी, जानराव सोयाम,कवडू कन्नाके, भानुदास कोवे, पार्वती मेश्राम, रामदास कोवे,होमदेव मडावी, नानाजी कुडमथे इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.