
प्रतिनिधी ::प्रवीण जोशी
कचरा संकलन करण्यासाठी वाहने आहेत पण ती नादुरुस्त स्वरूपात दिसतात. खराब तर होणारच मग ती दुरुस्त करायची नाहीत का? घाणीमुळे रोगराई निर्माण होऊ शकते त्यामुळे ती उचलून त्याचे विल्हेवाट लावण्याचे काम प्राधान्याने करायला पाहिजे.
नवीन असलेले ट्रॅक्टर बिघडते म्हणजे कमालीची बाब आहे. एक किंवा दोन वाहने चालू राहिल्याने शहरातील कचरा समस्या मिटेल? सगळी वाहने दुरुस्त असली व ती वाहन रोज शहराच्या विविध भागात फिरल्यास मोठ्या प्रमाणात कचरा होणार नाही. पण जी काही अडचण असल्यास ती निवडणुका लागण्याआधी दूर केल्या असत्या तर कचरा समस्या एवढी बिकट ठरली नसती. प्रशासक असताना शहरावर कचरा समस्या उद्भभवते? कोणती कागदपत्र काढायचे असल्यास आधी त्यावर साहेबांची स्वाक्षरी घेऊन या नंतरच कागदपत्रे देऊ आणि साहेब कर भरा असं सांगतात. तर मग त्यांनी कचरा संकलन आणि इतर समस्याकडे लक्ष दिल्यास बरं होईल. काही दिवसात वाहन बिघडतात कसे आणि बिघडले तर दुरुस्त होत नाहीत याचे गुढ रहस्य मात्र कायमच राहते??
एकेकाळी ढाणकी शहरातील टेंभेश्वर नगर येथील जिल्हा परिषदची शाळा म्हणजे एक उत्कृष्ट शैक्षणिक ठिकाण म्हणून आजूबाजूच्या पंचकोशीत प्रसिद्ध होते. पण त्या शाळेसमोर मोठ्या प्रमाणात समोरच्या भागालाच पॉलिथिन सदृश्य कचरा आहे. तेथील रहिवाशांना व विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. पण नगरपंचायत प्रशासनाची कचरा संकलन करणारी यंत्रणा इथपर्यंत पोहोचू शकली नाही. किंवा जिल्हा परिषद शाळा ही संपूर्ण झाडाझुडपांनी व्यापली असताना शाळा प्रशासनाने सुद्धा याबाबत शाळेचा परिसर स्वच्छ ठेवायचा असताना या संदर्भात निष्काळजी पणा दिसून येतो. नगरपंचायत प्रशासन कचरा उचलून शाळेचा अस्वच्छ असलेला परिसर व तेथील रहिवाशांना यातून दिलासा देईल का? हे येणारा काळाच ठरवेल.
