
सहसंपादक : रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील गोर -गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे हक्क मिळवून देतात त्या जि. प. च्या शाळा,समाजाचा देखील यात वाटा असतो किमान ज्यांनी यशाचे उत्तुंग शिखर गाठले त्यांचे या शाळांकडे सहसा लक्ष जात नाही . मात्र याला अपवाद ठरावा असा एक सुंदर सोहळा जि. प. उ. प्रा. शाळा गुजरी येथे आकारास आला. युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले यांनी या शाळेला दी. 19 सप्टेंबर रोजी भेट दिली नुसती भेट देऊनच ते थांबले नाही. शाळेतील 1 ते 7 च्या सर्व विध्यार्थ्यांना त्यांनी स्कुल बॅग दिल्या,व्हाईट बोर्ड दिले. प्रशासनातील अधिकारी वर्गाने ही या कार्यक्रमाला उपस्थित राहून दाद दिली.
तहसीलदार अमित भोईटे, गट विकास अधिकारी केशव पवार, गटशिक्षणाधिकारी राजू काकडे यांचे सह साई सेवाश्रम चे संचालक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. या वेळी शैक्षणिक साहित्य विध्यार्थ्यांना स्कुल बॅग वाटप व पालक मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष विलासराव बापू भोयर उपस्थित होते.
लोकसहभागातून शाळा समृद्ध करण्याचा हा उपक्रम तालुक्यात अनेकांकरीता प्रेरणादायी ठरला. शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी शैक्षणिक साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासराव भोयर यांनी गावं हा विश्व|चा नकाशा असेल तर गावाचे सर्वांगीन विकासाचे केंद्र शाळा असते त्या कडे प्रत्येकाने लक्ष देण्याच्या गरजेवर अध्यक्षीय मनोगतातून भाष्य केले.प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अमित भोईटे यांनी युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले यांनी जि. प. शाळे बाबत सकारात्मक भूमिका घेतल्याने आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. गट विकास अधिकारी यांनी अनेकांचे डॉक्टर, इंजिनिअर बनन्याचे स्वप्न असते पण आपण रोजगार देणारे उद्योजक बनावे असा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने विध्यार्थ्यांपर्यंत पोहचला यावर प्रकाश टाकला. गट शिक्षणाधिकारी राजू काकडे यांनी देशातील 40 पैकी 12 क्रमांकाचे युवा उद्योजक आमच्या जि. प. शाळेचा विचार करतात विचारच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतुन हा संदेश देतात ही लक्षणीय बाब असल्याचे मनोगत व्यक्त केले. या वेळी युवा उद्योजक हृषीकेश मेंडोले यांचा शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेला व विध्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करन्यात आले. या वेळी गुजरी येथील नागरीक, पालक , महिला भगिनीं व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करीता शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले.
सत्काराला उत्तर देतांना हृषीकेश मेंडोले यांनी विविध विषयावर आपले मत मांडले.माझे प्राथमिक शिक्षण जि. प. च्या शाळेत झाले,उच्च शिक्षण नाशिक व पुणे येथे झाले. काही काळ मी शिक्षकाचे काम देखील केले आहे. चार वर्ष नौकरी केली.मेहनत घेतली की यश निश्चितच मिळते.महिन्यातील साधारणतः 28 दिवस प्रवासात राहतो. माझ्या आयुष्यातील मुख्य ध्येय हे अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे हेच आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यामध्ये खूप क्षमता असते त्याला ओळखा व योग्य वळण दया अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
