
सहसंपादक: रामभाऊ भोयर
दि. 9 फेब्रुवारी 2026 पासून राळेगाव शहर विकास संघर्ष समितीचे वतीने कायम पट्टे, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती व इतर मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते . नागरिकांनी न्याय मानण्यासाठी या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला, तहसीलदार राळेगाव, मुख्याधिकारी न.प. राळेगाव प्रशासन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी येऊन 15 दिवसात मागण्यांची पूर्तता करू असे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. हा कालावधी उलटून गेल्याने आज दि.10 मार्च रोजी या मागणीचा पाठपुरावा करण्याकरता असंख्य नागरिक माता भगिनी यांनी पाठपुरावा केला, आग्रही व आक्रमक मागणी केली, या वेळी 2 एप्रिल 2026 पासून कायम पट्टे अर्ज स्वीकारून घेण्यास सुरुवात होईल असे आश्वासन देण्यात आले. या सोबतच इतर मागण्या बाबत ही सकारात्मकता दाखवण्यात आली. राळेगाव शहर विकास संघर्ष समितीने या मागण्या लावून धरल्याने प्रश्न चांगलाच ऐरणीवर आणल्या गेला .आज मंगळवार ला संघर्ष समिती ने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतल्याचे या वेळी दिसून आले. दिलेले आश्वासन पूर्ण करा अशी मागणी घेऊन असंख्य महिला व नागरिकांनी न.प. वर धडक दिली. मुख्याधिकारी यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून आता आंदोलनाची गरज पडणार नाही, मार्च अँडिंग चे कामे होऊ दया एप्रिल च्या 2 तारखेपासून कायम पट्टे अर्ज स्वीकारू, घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती व संबंधित सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच दादा बादशहा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आठवड्याभरात व्यवस्था करून देऊ असे आश्वासन पाणीपुरवठा सभापती जानराव गिरी यांनी दिले. सर्व मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. पाठपुरावा याच पद्धतीने केल्या जाईल , वेळ प्रसंगी तीव्र आंदोलन करण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे अशी प्रतिक्रिया शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी व्यक्त केली. यावेळी ,मंगेश भाऊ राऊत,वैभव पंडित ,दिलीप कन्नाके,सागर वनस्कर,निकेत भलमे,अनिल राऊत, दिनेश करपते, देवराव नाखले ( उपशहर प्रमुख, उ. बा. ठा.), चेतन नगराळे, विजय धानोरकर, , मोरेश्वर फाटे, गिरीधर ससनकर , आकाश कूळसंगे, रामेश्वर एंबडवार, राहुल गुप्ता, महादेव गेडाम, श्रीकृष्ण जाधव, अंजना बाई कुडमथे, अंकुश आत्राम, सदानंद कांबळे, चंदा बाई एचलवार, शेख सलमान, नयन कन्नाके, संदेश गिरी, रमेश गांधी, नरेश चांदेकर, राजेंद्र ठाकूर, काजल कुरेशी, मंगला चहार, सखूबाई छापेकर , अन्वर पटेल, गजानन सोनवणे, शीला वाकुलकर , विजय राठोड, गजानन पेंदाम, गफार सैय्यद, अनिता गोल्हर, सविता पेंदोर, भारती ठाकूर उपस्थित होते.
