
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर
शहरातील ग्रामीण विकास प्रकल्प येथे साप्ताहिक राळेगाव नगरी वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राळेगाव येथील तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे हे अध्यक्ष स्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अड प्रफुल्लभाऊ मानकर काँग्रेस प्रवक्ते अरविंदभाऊ वाढोनकर यवतमाळ अर्बन बँकेचे संचालक अड प्रफुल्लभाऊ चौहान, गोवर्धनरावजी वाघमारे जानरावभाऊ गिरी पप्रदीपभाऊठुने मनोहरराव जूनुणकर वर्षाताई तेलंगे प्रकाशजी मेहता, राजुभाऊ पोटे, बाबारावजी निमरड हे उपस्थित होते ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याचे काम फक्त साप्ताहिक व स्थानिक वृत्तपत्र बातम्या टाकून सोडवू शकतो कारण वृत्तपत्राच्या संपादकांची नाळ ही आपल्या तालुक्याशी जुळलेली असते व त्यांना आपला तालुका हा समृध्द करण्याचा ध्यास असतो त्यामुळे साप्ताहिक वृत्तपत्रे हे ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याचे काम करत आहे असे साप्ताहिक राळेगाव नगरी वृत्तपत्राचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाच्या वेळी राळेगाव येथील तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांनी बोलून दाखवले या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी साप्ताहिक राळेगाव नगरी वृत्तपत्राला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
