
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव शहरातील माजी सैनिक आणि सध्या वडकी पोलीस स्टेशन ला कार्यरत असलेले पोलीस शिपाई धनराज शेगेकर यांचा मुलगा चि.ओम हा नुकत्याच झालेल्या JEE या परिक्षेत संपुर्ण भारतातुन बसलेल्या 15लाख विद्यार्थ्यांमधून 1491 नंबरवर पास झाला.
2022मध्ये शेगेकर यांचा मोठा मुलगा प्रणय हा सुध्दा 1016 नंबरवर पास झाला होता.तो संध्या तिनं वर्षापासुन IIT खडकपुर (पश्चिम बंगाल कलकत्ता)पुर्ण करीत आहे. या त्याच्या यशाबद्दल नगरसेवक शशिकांत उर्फ बाळू धुमाळ व सेवानिवृत आदर्श शिक्षक गिरिधर ससनकर यांनी या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला .
या दोन्ही विद्यार्थ्यांचे आजी आजोबा सेवानिवृत्त शिक्षक होते तर आई सौ वणिता ह्या गृहिणी आहे.ओम हा आपलं सर्व श्रेय शिक्षक,आजी,आजोबा,आई वडिल व मोठा भाऊ प्रणय यांना देतो.
तसेच ही बाब पोलीस विभागासाठी गौरवाची असुन ओमचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
