
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ:- जिल्हा वाहतूक शाखा ही अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यावर कार्यवाही करण्यासाठीं आहे की लग्न सराईत पठानी वसुली करण्यासाठीं आहे असे बोलतांना लग्नातील वऱ्हाडी मंडळी दिसत आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून मासिक आर्थिक रसद दिली जाते . त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यावर कार्यवाही करण्यात येत नाही तर लग्न सराईत ये जा करणाऱ्या वाहनाला थांबवून त्यांच्याकडून पठाणी वसुली करण्यात येत आहे याचे उदाहरण म्हणजे बाभुळगाव येथे राळेगाव येथील गरीब व्यक्तीच्या घरचे लग्न होतें . ते वऱ्हाडी घेऊन बाभुळगाव येथे जात असताना त्यांना कळंब बाभुळगाव रोडवर वेणी कोटा येथे जिल्हा वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी यांनी थांबवले व तुमच्या गाडीत जास्तं प्रवाशी आहे. त्यामुळे तुम्हाला दहा हजार रुपये दंड पडेल परंतु गाडीत आठ प्रवाशी होतें तरीहि त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतले . व कोणत्याही प्रकारची पावती दिली नाही यावरून असे दिसुन येते कि दिवसभरात किती रूपये ते दोन कर्मचारी वसुली करत असेल याचा अंदाज नाही. आधीच शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी मुलाला मुलगी द्यायला कोणी तयार नाही आणि त्यात कसेबसे शेतकरी कमी पैशात लग्न करतो परंतु त्यांच्या लग्न वऱ्हाडाच्या गाडया थांबवून त्यांच्या जवळून पैशांची मागणी करण्याचे काम वाहतूक शाखेचे दोन कर्मचारी करत आहे. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांमुळे यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखा बदनाम होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यासोबत एकही अधिकारी नसतो मग त्यांना पैसै वसूल करण्याच्या अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .त्यामुळे कळंब बाभुळगाव रोडवर दोन वाहतूक शाखेचे कर्मचारी पठाणी वसली करत आहे त्यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हा वाहतूक शाखेचे ठाणेदार यांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.
