
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
शेतशिवारातून काम आटोपून परत येत असताना अचानक भोवळ येऊन चालत्या ट्रॅक्टरच्या खाली पडल्याने, चाकाखाली दबुन चालकाचा मृत्यु झाला. ही घटना दि. 20 रोजी दुपारी 4.00 वाजताचे सुमारास गवंडी शिवारात घडली. यातील मृतक चालकाचे नांव सुनिल नागोराव गाडेकर, वय 40 वर्षे, रा. खर्डा असे आहे. याबाबत नागोराव केशव गाडेकर वय 65 वर्षे, रा. खर्डा यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदवली.
प्राप्त माहिती नुसार सुनिल गाडेकर हा संतोष सुदाम गोरडे रा. खर्डा यांचे ट्रॅक्टरवर चालकाचे काम करीत होता. दि. 20 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी तो आपल्या कामावर पप्पु वेनूरकर, रा. गवंडी यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने पंजी मारण्यासाठी गेला होता. तेथील काम आटोपून तो 4.00 वाजताचे दरम्यान घरी परत येत असताना हरीदास परडखे यांच्या गवंडी शेतशिवारातील शेतातून ट्रॅक्टर चालवत असताना अचानक भोवळ येवून चालत्या ट्रॅक्टर मधून खाली पडला. त्याचे अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तो जागीच मृत पावला. याबाबत ट्रॅक्टर मालक संतोष गोरडे यांनी नागोराव गाडेकर यांना फोन करून माहिती दिली. त्यावरून गाडेकर यांच्या फिर्यादीवरून जमादार अशोक गायकी, पोलिस कर्मचारी आशिष अवझाडे, सागर बेलसरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
