
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शालेय शिक्षण विभागात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत नवोन्मेष हिंदी विषयाची कार्यशाळा न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी स्वयं अध्ययन., सह अध्ययन तसेंच मूल्यमापन तंत्र याविषयीं जिल्हा तज्ञ् मार्गदर्शक म्हणून विनोद चिरडे यांनी राळेगाव तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळेत राळेगाव नवोन्मेष उपक्रम प्रमुख म्हणून मुख्याध्यापक राजेश शर्मा यांनी यावेळी कामकाज पाहिले. नवोन्मेष हिंदी विषयाच्या कार्यशाळे करिता राळेगाव तालुक्यातील 30 शिक्षक उपस्थित होते.तर जिल्ह्यातील नवोन्मेष या कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर, तर राळेगाव तालुका गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने यांचे मार्गदर्शन लाभले आहे…..
