
हिमायतनगर प्रतिनिधी (परमेश्वर सुर्यवंशी)
हिमायतनगर शहरात गेल्या चार दिवसापासून संततधार पाऊस सुरु आहे, त्यामुळे अनेक प्रभागातील नाल्या तुंबून घाण पाणी रत्स्यावर आले आहे. नाल्या भरलेल्या असल्यामुळे घाण पाणी वाहून जाण्यास रस्ता नसल्याने डासांची उत्पत्ती वाढली असून, दुर्गंधीमुळे पाणी साचून राहत असल्याने आता आल्या होऊन अनेकांच्या घरात घाण पाण्याबरोबर शिरत असल्याने सर्दी-खोकला, संडास, उलट्या, ताप, डेंगू, चिकन गुणियासह, गेस्ट्रोची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अश्या विविध आजाराने ग्रासल्यामुळे रहीम कॉलनीतील नागरिकांनी नगरपंचायतीचे प्रशासक, प्रभारी, स्वच्छता निरीक्षक व महिन्याला १३ लक्ष रुपये घेणाऱ्या ठेकेदारच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्गंधीमुळे कोणत्याही नागरिकांचं काही बरे वाईट झालं तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यास ठेकेदार जबाबदार राहील… असा आरोपही नागरिकांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचातीत सण २००५ मध्ये झाले आहे. नगरपंचायत झाल्यानंतर शहरातील नागरिकांना नागरी सुविधांसह सुरक्षित आरोग्यासह अन्य सुविधा उपलब्ध होतील अशी अशा होती. मात्र याचे उलटाच झाले असून, नगरपंचायत म्हणजे केवळ ओ चोरी बंधो भारा… अधा तेरा अधा मेरा…. या उक्तीप्रमाणे स्वतःचे घर भरण्याचा अड्डा झाली असल्याची चर्चा सुजाण नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळते आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकाच्या हातात कारभार आल्यावर शहरात आत्तातरी नागरी सुविधा मिळतील असे वाटत असताना प्रशासक व प्रभारी राज असलेल्या काळातही नागरिकांची दैना होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट असल्याने आणि पावसाळा सुरु असल्याने शहरातील नाल्याची साफ सफाई आणि रस्त्यावर घाण पाणी येणार नाही तसेच घाणीचे साम्राज्य होणार नाही याकडे ठेकेदाराने कटाक्षाने लक्ष देऊन शहर स्वच्छ सुंदर ठेवणे क्रमप्राप्त आहे. मात्र येथील स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या पल्लवी इंटरप्रायजेसच्या ठेकेदाराने नांदेड शहरात राहून आपला मनमानी कारभार प्रशासकाच्या काळातही जैसेथेच सुरूच ठेवला आहे.
पावसाळा सुरु असल्याने पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्याची सफाई करणे गरजेचे होते. मात्र ठेकेदारने तसे केले नाही, दिखाव्यापुरते परमेश्वर मंदिर व इतर भागात नाल्याची सफाई करून अनेक प्रभागातील कामे प्रलंबित ठेवली. त्यामुळे याचे परिणाम संततधार सुरु असलेल्या पावसात दिसून येत आहेत. शहरातील चौपाटी, वॉर्ड क्रमांक १३ मधील कोर्टाच्या पाठीमागे, रहीम कॉलनी, लाकडोबा चौक, जनता कॉलनी, सराफ लाईन, पळसपूर रस्ताचौक, बजरंग चौक, मोमीनपुरा, सिरंजनी रस्ता चौक, आंबेडकर चौक, आदींसह शहरातील अनेक प्रभागातील गल्लीबोळात दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर येऊन साचून राहते आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि आळ्या तयार होऊन याचा त्रास नागरिकांना करावा लागतो आहे. एव्हढेच नाहीतर शहरातील अनेक घरासमोर पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना या धन्य पाण्यातून घरात ये -जा करावी लागते आहे. यामुळे अनेक भागातील नागरिकांच्या घरातील सदस्यांना ताप, सर्दी-खोकला, डायरिया, उलटी जुलाब, आदी आजाराने ग्रासले आहे. या आजाराने त्रस्त झालेले नागरिक कोरोना महामारीसह आता नगरपंचायत प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आजाराला निमंत्रण मिळत असल्याचे बोलून दाखवीत आहेत.
१५ दिवसाला कधीतरी चार-पाच वेळा सूचना दिल्यावर नगरपंचायतीचे मोजकेच कर्मचारी या ठिकाणी येऊन थातुर – माथूर पद्धतीने नाल्याची सफाई करतात, सफाई केलेली घाणही तात्काळ नेत नसल्याने अल्पसा पाऊस होतच पुन्हा तीच घाण नालीत परत येते. त्यामुळे पावसाचे पाणी पुढे वाहून जाण्यास अडचण निर्मण होऊन वाहून आलेली घाण त्याच ठिकाणी सोडून दुर्गंधी सुटते आहे. घाण तशीच राहत असल्याने त्यात अळ्यांची आणि डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांच्या घरात धावत आहेत. परिणामी विविध आजारांना निमंत्रण मिळत असल्याने लहान लेकरांमध्ये सर्दी-खोकला व्हायरल फिव्हरची लक्षणे वाढली आहेत. घाणीची परिस्थिती अशीच राहिल्यास डेंग्यू, चिकन गुणिया, गेस्ट्रो सारख्या साथीचे आजार वाढण्याची शक्यता बळावली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी याच दिवसात संसर्ग झपाट्याने झाला होता. दोन्ही लाटेत शहरात संसर्ग उच्चांकी होऊन अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. सुदैवाने सध्यातरी शहरात कोरोनाचा रुग्ण नाही मात्र या व्हायरल फेवर आणी दुर्गंधीमुळे होणारी परिसराचे दूषित वातावरण तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते.
हि बाब लक्षात घेता नगरपंचायतीच्या अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारने आतातरी कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन प्रथम प्राध्यान्य स्वच्छतेला देऊन शहरातील जनतेच्या आरोग्याला निर्माण होणारी बाधा दूर करून सुरक्षिततेची हमी देण्यासाठी शहरातील सर्व नाल्यांची सफाई करावी. ज्या ठिकाणी नाल्या तुंबतात त्या ठिकाणच्या पुलाजवळील पाईपलाईन जेसीबीने काढून नव्याने मोठे पाईप टाकून घाण पाणी वाहण्याचा रस्ता मोकळा करावा. ठिकठिकाणी कचरा कुंडीत टाकण्यात येणारी घाण दररोज सकाळी ८ पूर्वी उचलून नेण्यात यावी, नाल्याची सफाई केल्यावर ती घाण तात्काळ उचलण्यात यावी, डासांच्या व अळ्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्यात यावी, आणि निकृष्ट कामामुळे अल्पावधीत खड्डेमय झालेल्या रस्त्यावरील खाडी तात्काळ बुजविण्यात यावे. तरच शहरातील जनतेला आरोग्याची हमी मिळेल. आणि नागरिकांना टैक्स भर म्हणण्याचा अधिकार नगरपंचायतीला गाजवीत येईल, नांदेडला राहून हिमायतनगर शहरच्या स्वच्छतेचा कारभार पाहणाऱ्या ठेकेदाराला कामात कुचरणी केल्या प्रकरणी नागरिकांना निर्माण झालेल्या समस्येला जबाबदार धरून ठेका रद्द करण्यात यावा. अन्यथा आम्हा नागरिकांना ठेकेदारासह संबंधित नपाच्या अधिकाऱ्यांना भर चौकात उभं करून रट्टे देत जोडे मारावे लागतील आणि नागरी समस्या सोडवून घेण्यासाठी उपोषण मांडावे लागेल अश्या संतापजनक भावना, या भागातील सुजाण नागरिक अत्ताउल्ला खान, जब्बार मिस्त्री, राजेश जाधव, मेहताज बेगम, शे.जाहूर शे.मसूद, स.कलीम स.जमील, सलीम खान, आदींसह वॉर्ड क्रमांक १३ मधील रहीम कॉलनी भागातील नागरिकांसह शहरातील अनेक सुशिक्षित नागरिकांनी बोलून दाखविल्या आहेत.
भरपूर तक्रारी होऊनही ठेकेदारांचा ठेका रद्द करण्यात टाळाटाळ – सरदार खान पठाण
शहराच्या स्वचछतेसाठी महिन्याकाठी १३ लक्ष रुपये स्वच्छतेच्या ठेकदारास स्वच्छतेच्या कामासाठी मोबदला दिला जातो. मात्र शहराची स्वच्छता नं होता उलट घाण व दुर्गंधी वाढत असल्याचे प्रशासकांसह, प्रभारी अधिकारी व नांदेडला राहून अँडाऊन करणारे कर्मचारी आणि नांदेडहून कारभार पाहणाऱ्या पल्लवीच्या ठेकेदार यांची मिलीभगत असल्याने शहर घाणीच्या विळख्यात आले आहे. आम्ही ग्रामपंचायतीत असताना शहराची स्वच्छता ६० हजारात होऊन कर्मचाऱ्यांच्या पगारी देखील केली जात होती. वाढून वाढून २ लक्ष नाहीतरी ५ लक्ष स्वच्छतेच्या कामासाठी भरपूर आहेत. मात्र महिन्याकाठी १३ लक्ष रुपये देण्यासाठी किती जणांनी आपला हिस्सा यात राखून ठेवला कि काय…? अशी शंकाही आम्हाला येते आहे. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणाऱ्या स्वच्छता निरिक्षासह प्रशासक, आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्याच्या कारभारामुळे ठेकेदार स्वच्छतेत हलगर्जीपणा करत आहे.म्हणून त्याचं नाव काळ्या यादीत समाविष्ठ करून ठेका रद्द करण्यात यावा. आणि आजवर स्वचतेच्या नावाने उचलण्यात आलेली देयके वसूल करून शहराच्या विकास कामात तो पैसे वापरण्यात यावा. अशी मागणी ५ वेळा मी जिल्हाधिकारी महोदयाकडे निवेदन देऊन केली आहे. मात्र शुल्लक दंड आकारून पुन्हा त्याचं ठेकदाराला ठेका देण्याचे काम केल्या गेले आहे. खरे पाहता सुरुवातील जेंव्हा या ठेकेदारावर पोलिसात गुन्हा दाखल झाला त्याच वेळेला पल्लवीचा ठेका रद्द करायला हवा होता मात्र प्रशासनातील खाबुगिरीने बरबटलेले अधिकारी आणि लोकप्रतिनिधीमुळे ठेकेदाराला अभय दिल्या गेले असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान पठाण यांनी केला आहे.
