महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेना यवतमाळ चे वतीने दि १/२/०२५ रोजी कोल्हे सभागृह राळेगाव येथे विदर्भ स्तरीय वधुवर परिचय मेळावा व समाज जोडो अभियान तथा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ चे अध्यक्ष श्री मारोतराव पडाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे . या मेळाव्यामध्ये भोई समाजातील विवाह ईच्छुक उपवर वधुंची नोंदणी करुन परिचय करून घेण्यात येणार आहे . नोंदणी फी तिनशे रुपये भरुन नोंदणी करावी . संघटनेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या स्मरणिकेमध्ये नोंदणी झालेल्या वधुवरांची माहिती टाकण्यात येणार आहे .तसेच या मेळाव्यामध्ये समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी,गुणवंत विद्यार्थी ,समाजिक कार्यकर्ते व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा भोई समाज संघटनेचे वतीने गौरव करण्यात येणार आहे . कार्यक्रमामध्ये विवाह ईच्छुक उपवर वधुंनी व सत्कारास पात्र असणाऱ्यांनी मेळाव्यास्थळी प्रत्यक्ष नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा .खा श्री संजयभाऊ देशमुख,उद्घाटक म्हणून आदिवासी विकास मंत्री मा श्री अशोकराव ऊईके,मा आ श्री बाळासाहेब मांगुळकर,मा आ श्री संजयजी मेश्राम उमरेड मतदार संघ तथा भोई समाजाचे नेते श्री दिनानाथजी वाघमारे संघर्ष वाहिनी , श्री पुंडलिकराव बावनकुळे, श्री प्रकाशजी डायरे सेवानिवृत्त सहसंचालक विदर्भ विकास मंडळ नागपूर, श्री प्रफुल्ल मानकर अध्यक्ष कांग्रेस कमिटी यवतमाळ तथा भोई समाजाचे नेते उपस्थित राहुन समाज जोडण्याकरीता मार्गदर्शन करणार आहेत .तेव्हा मोठ्या प्रमाणात भोई समाज बांधवांनी भोई समाज मेळाव्याला उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन श्री मारोतराव पडाळ, श्री महादेवराव वाघाडे ,परसराम करलुके , हनुमानजी सातघरे व राहुल पडाळ यांनी केले .
राळेगाव येथे विदर्भ स्तरीय भोई समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन
- Post author:lkhtpt
- Post published:January 25, 2025
- Post category:Uncategorized
