
सहसंपादक : रामभाऊ भोयर
AFPRO अफप्रो या सामाजिक संस्थेद्वारे कपाशी उत्पादक LG लीडर यांच्याकरिता प्रशिक्षण संपन्न झाले. यामध्ये २३ गावामधून ७० प्रगत शेतकरी बांधवाना सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प अंतर्गत LG लीडर यांना पुनरावृत्ती प्रशिक्षण वरद ता .राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे दिनांक ०६/०३/२०२५ रोजी ग्राम पंचायत सभागृह येथे आयोजित केला.
सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प अंतर्गत या कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून सरपंच श्री. निलेशभाऊ रोठे हे होते. तसेच उप सरपंच श्री. ज्ञानेश्वर डोफे LG प्रफुलभाऊ ढाले , प्रगतशील LG लीडर श्री.अंबादासजी सोनवणे सराटी, प्रमुख मार्गदर्शक प्रकल्प व्यवस्थापक श्री. सचिन मातले, ॲफरो AFPRO यवतमाळ, श्री. नंदकिशोर डेहनकर, PU मॅनेजर,राळेगाव, हे उपस्थितीत पार पडला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. नंदकिशोर डेहनकर यांनी केले, त्यांनी सुधारित कापूस आदर्श पद्धत प्रकल्प राबवत असलेले तत्व ज्यामध्ये डेटा व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधने, पिक संरक्षण, कापूस गुणवत्ता , सभ्य काम आणि याबरोबरच वातावरण बदल व स्त्री-पुरुष सामानात यावर माहिती दिली . यासोबतच वातावरण बद्दलचे शेती उत्पादनावर होणारे परिणाम याबाबत सांगितले. कपाशी उत्पादन करतांना वाढणारा खर्च व नैसर्गिक साधनांचा वापर करून जैविक कीटनाशकाचा वापर करावा याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक श्री. सचिन मातले यांनी जमिनीचे शाश्वत आरोग्य व्यवस्थापन यावर सादरीकरण करून उपस्थित शेतकरी बांधवाना मृदा आरोग्य याबाबत सांगलीतले. सुपीक जमिनीचे गुणधर्म, भौतिक,रासायनिक व जैविक घटकाचे महत्त्व समजावून सांगितले. जमिनीची रचना व सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकणे, पिकांचे अवशेष पासून खत बनविणे, हिरवळेचे पिके व विविध बांधावरील जैविक निविष्ठा याबाबत सखोल मार्गदर्शन केले. प्रगतशील LG लीडर श्री.अंबादासजी सोनवणे सराटी, यांनी जैविक कीटनाशक यामध्ये निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. भगवान डोफे कृषी मित्र वरद यांनी केले. त्याचबरोबर कीटकनाशक फवारणी करतांना सौरक्षणात्मिका बाबांचा वापर करावा ज्या मध्ये शरीराचा कोणताही अवयव सरळ फवारणी करतांना संपर्कांत येणार नाही याबाबत सांगितले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कृषी मित्र प्रवीण चिडे, कृषी रंजीत कनाके, आशिष काळोकार,वृषभ दारुंडे,फील्ड कोऑर्डिनटोर राजू वानखडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रगतशील शेतकरी उपस्थतीत होते.
