
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शालेय क्रीडा विभागस्तरीय
14 व 17 वर्ष वयोगटातील टेनिस हॉलिबॉल मैदानी स्पर्धा स्कूल ऑफ स्कोलर्स, हिंगणा रोड, अकोला येथे 12 जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मैदानी स्पर्धेत आपला दबदबा असणारे राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील 14 व 17 वर्ष वयोगटातील मुले असे दोन संघ झालेल्या अंतिम स्पर्धेत एकाच वेळी विजेते ठरून हे दोन संघ राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पात्र झाले आहे..
विजयी १४ वर्ष संघात हे विद्यार्थी खेडाळू म्हणून आवेश नाकेवार, निहालसिंग ठाकूर, स्मित उईके, पुष्कर जुमनाके, यज्ञेश बोभाटे, जिग्नेश वनकर उपस्थित होते. तर १७ वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात खेळाडूं म्हणून वेदांत बोदडे, मंथन ठाकरे, अर्पित राऊत, सोहम साळवे, नयन पेंदोर, यश ढगले हे खेडाळू उपस्थित होते. हे दोन ही विजयी संघ आता राज्यस्तरीय स्पर्धा जयहिंद पब्लिक स्कूल, उदगीर जि लातूर येथे दिनांक 17 ते 18 जानेवारी साठी पात्र ठरले आहे. या यशस्वी संघा बद्दल न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगावचे अध्यक्ष बी. के. धर्मे, सचिव डॉ. अर्चना धर्मे तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे क्रीडा शिक्षक किशोर उईके, आनंद घुगे, प्रवीण कारेकर, वैशाली चौधरी यांच्या सह शाळेतील शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे…
