के.बी. एच.विद्यालय, पवननगर, सिडको येथे पर्यावरण पूरक शाडूमातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित के.बी. एच.विद्यालय, पवननगर, सिडको, नाशिक येथे दि.25/08/2022 गुरुवार रोजी मुख्याध्यापक श्री.आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक शाडूमातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती…..
उपमुख्यधापिका सौ.युगंधरा देशमुख व पर्यवेक्षक श्री.उमेश देवरे यांच्या शुभहस्ते कार्यशाळाचे उदघाटन करण्यात आले सदर कार्यशाळेला इ 5 वी. ते 8 वी.च्या 500 ते 600 मुलांनी मोठया उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला अनेक गणपती चे शाडूमातीपासून चे वेगवेगळ्या रूपात दर्शन झाले. शाळेमध्ये धार्मिक, भावनिक,शैक्षणिक वातावरण निर्माण झाले होते. तसेच शाळेतील कलाशिक्षक श्री.संजय जगताप व श्री संजय कदम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शाडूमाती पासून गणपती बनवण्याचे प्रक्षिक्षण दिले.
सदर कार्यक्रमास ,पालक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार श्रीमती कविता सोनवणे यांनी केले……