परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मेघना कवाली थेट बांधावर

सहसंपादक : रामभाऊ भोयर

नवीन खरीप हंगामातील ई- पीक पाहणी नोंदणीकरिता परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव मेघना कवाली व तहसीलदार अमित भोईटे थेट शेताच्या बांधावर धडकले. त्यांनी शेतकऱ्यांना विविध सूचनाही दिल्या असून
शेतकऱ्यांच्या सातबारावर चालू खरीप हंगामातील पीक ऑनलाइन ई- पीक पाहणी अॅपवर नोंदवायची आहे. याकरिता महसूल विभाग सज्ज आहे. सोमवारी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मेघना कवाली, तहसीलदार अमित भोईटे, तलाठी मोहन सरतापे , सौरभ तुमसकर यांनी राळेगाव येथील वाऱ्हा रोडवर असलेल्या शेत शिवारातील बांधावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांना अॅपव्दारे आपल्या पिकाची नोंदणी कशी करावी, याची माहिती दिली तसेच परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मेघना कवाली यांनी शेतात असलेल्या पिकाबद्दल शेतकरी तथा नगर पंचायतचे उपनराध्यक्ष जानराव गिरी यांना माहिती विचारली तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागतो याबाबत माहिती दिली. यावेळी प्रविण गिरी, बंडू लोहकरे, गजानन पाल नरेश दुर्गे, कमलेश गहलोत व परिसरातील शेतकरी उपस्थीत होते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंदणी त्वरित करून घ्यावी, असे आवाहन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राळेगाव मेघना कवाली व तहसीलदार भोईटे यांनी केले.