
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव : वीर भगतसिंग यांच्या विचारांना अभिवादन करत युवकांना खेळाकडे वळविणे तसेच व्यसनमुक्त जीवनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वीर भगतसिंग संघटना, राळेगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या वतीने प्रतिमेचे पूजन व मान्यवरांचे स्वागत करून
या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. 5km, व 3km रनिंग साठी वीर भगतसिंग चौक, ते रावेरी रोडवरील पेट्रोल पंपापर्यंत आणि पुन्हा वीर भगतसिंग चौक येथे समारोप अशी मार्गरेषा तयार करण्यात आली असून स्पर्धेत एकूण ३५१ मुले-मुली चा सहभाग झाल्याची नोंद करण्यात आली.
बक्षीस वितरण :
मुले गटात प्रथम ६ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार व पाचवे १ हजार रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात आली.
मुली गटात प्रथम ५ हजार, द्वितीय ४ हजार, तृतीय ३ हजार, चतुर्थ २ हजार व पाचवे १ हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली.
विजेते खेळाडू :
मुले गटात प्रथम कपिल हटकर, द्वितीय प्रणव राठोड, तृतीय रोशन राठोड, चतुर्थ करण खंडारे व पाचवे शंकर नांदे यांनी यश संपादन केले.
मुली गटात प्रथम प्रगती जाधव, द्वितीय गौरी चौताडे, तृतीय मीनाक्षी, चतुर्थ सुनीता राठोड व पाचवे सुचिता पवार यांनी बाजी मारली.
या स्पर्धेसाठी श्वेता हर्षद छोरीया (DPO Division SECR नागपूर), सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी राळेगाव), अमित भोईटे (तहसीलदार), शीतल मालटे (पोलीस निरीक्षक), नगराध्यक्ष रवींद्र शेराम, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, विनयभाऊ मुनोत, गौरीनंदन कन्नाके (सामाजिक कार्यकर्ते) , हर्षद भाऊ छोरिया, डॉ.सोमनाथ भोयर, डॉ.हेमंत गलात,डॉ. ओमप्रकाश फुलमाळी, डॉ.मनोज पांगुळ, संजय भाऊ एकोणकार, प्रदीप भाऊ ठुणे, छायाताई पिंपरे, अफसर भाऊ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास सहकार्य केले.
सर्व विजेत्या खेळाडूंना रोख बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी नवोदय क्रिडा मंडळ, माजी सैनिक संघटना, पत्रकार संघटना, मॉर्निंग ग्रुप, डॉ.असोसिएशन संघटना सर्व राळेगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे युवकांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यास चालना मिळाली असून वीर भगतसिंग यांच्या देशभक्तीच्या विचारांचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच वीर भगतसिंग संघटनेचे अध्यक्ष निलेश हजारे, उपाध्यक्ष सागर एम्बडवार ,सचिव प्रद्युन इंगोले ,उपसचिव सुरज गुजरकर , कोषाध्यक्ष स्वप्निल हजारे, उपअध्यक्ष दिनेश करपते , समन्वयक सागर वर्मा , जनसंपर्क प्रमुख रोहित पिंपरे, मीडिया प्रमुख मंगेश पिंपरे, क्रीडा प्रमुख अजय चांदेकर, अविनाश हिवरकर, संघटनेचे सदस्य निखिल भासपाले ,प्रशांत भगत, एड दीक्षात खैरे , प्रवीण लाखसवार ,ऋषिकेश पिंपरे ,शैलेश ठाकरे ,हेमंत धांडे, सौरभ नारनवरे, आशिष सेकेकर, गणेश काळे, प्रफुल खडसे, राहुल गांधी, प्रशांत काटकर, त्याचबरोबर कार्यक्रमाचे संचालक रुपेशभाऊ रेंगे व आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव प्रदूण्य इंगोले ,अध्यक्ष निलेश भाऊ हजारे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
