अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शाखा राळेगाव तर्फे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करत मार्गदर्शक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

अभाविप विदर्भ प्रांत मंत्री श्री. अखिलेश जी भारतीय यांच्या सूचनेनुसार व जिल्हा संघटन मंत्री श्री दामोदर जी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली, आज दिनांक 26 जानेवारी 2022, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा राळेगाव अंतर्गत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारत माता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करत मार्गदर्शक व भाषणात्मक उपक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय नारी रक्षा संघटनेच्या तालुकाध्यक्षा सौ. संतोषी राजजी वर्मा उपस्थित होते. कार्यकर्ता वर्ग मध्ये नगर मंत्री अंकित तिवाडे, हर्ष वानखडे, चैताली वाणी, पायल थेरे, लक्ष्मण ढुमणे, अर्जुन वर्मा, लचित धनरे, विकी भोंगारे इ. कार्यकर्ता उपस्थित होते.