
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक 11/7/2025 रोज शुक्रवारला माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे/ निदर्शने आंदोलन पार पडले,यात आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक , विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा , आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या / समस्या घेऊन यवतमाळ येथे धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन विदर्भातील शिक्षणाधिकारी कार्यालयात, उपसंचालक कार्यालयात एकाच दिवशी संपन्न झाले.या आंदोलनात शिक्षण विभागातील 37 मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री,मा. शिक्षणमंत्री , बहुजन कल्याण व विकास मंत्री, आदिवासी मंत्री यांना पाठविण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. हे आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतिक अध्यक्ष अरविंद देशमुख सर यांच्या नेतृत्वात संपन्न झाले त्यावेळी माजी प्रांतिक विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पवन बन, यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे, कार्याध्यक्ष आनंद मेश्राम, विजय खरोडे, आश्रम शाळा संघटनेचे ज्ञानेश्वर गायकवाड, उर्दू शिक्षक संघटनेचे इरशाद खान संघटनेचे उपाध्यक्ष श्याम बोडे, दिवाकर नरूले, किशोर बोडे, उमाकांत राठोड, खोंडे सर, विलास वाघमारे, विजय गौरकार, दिलीप सिर्तावार सागोरे सर, कोल्हे सर यांच्या सह अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी व आजिवन सदस्य उपस्थित असल्याची माहिती विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
