
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पिपरी सावेत्री येथील सौरभ गोविंद वानखेडे वय २८ वर्ष यांनी दिनांक १०-८-२५ रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान विष प्राशन केले असल्याचे लक्षात येताच तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे नेण्यात आले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळताच खैरी बिट जमादार अमोल चौधरी हे तातडीने ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पोहचुन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला. पुढील तपास वडकी पोलिस करीत आहे.
