
प्रतिनिधी: संदीप जाधव उमरखेड

आज दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी चार वाजता मेट येथे भव्य भूमिपूजन समारंभ सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय आमदार श्री. नामदेव ससाने साहेब , आमदार उमरखेड विधानसभा यांच्या हस्ते
प्रमुख उपस्थिती: श्री. नितीनजी भुतडा जिल्हाध्यक्ष भाजपा, श्री उत्तम राव मोहन सिंग नाईक माजी सैनिक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, दिगंबर वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष भाजप. यांच्या उपस्थिततीत मेट विकास निधी:
१) पाणीपुरवठा योजना एक कोटी एकोणतीस लाख.
२) सिमेंट रस्ता दहा लाख.
३) नळ जोडणे नऊ लाख
विक्रम उत्तम राठोड, जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यवतमाळ तथा तालुका अध्यक्ष सरपंच सेवा संघ उमरखेड व समस्त गावकरी बांधव, माननीय अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते भव्य भूमिपूजन समारंभ सोहळा पार पडला. यात माननीय श्री नायक प्रेमसिंग राठोड यांच्या हस्ते श्री नामदेव जी ससाने यांचे स्वागत झाले, व माननीय श्री असामी थावरा चव्हाण यांच्या हस्ते श्री नितीनजी भुतडा यांचे स्वागत झाले, व श्री दत्त वानखेडे यांचे स्वागत माननीय श्री मनोज जाधव यांच्या हस्ते झाले. व समस्त गावकरी तथा ग्रामपंचायत सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.
